IMPIMP

Police Patil Recruitment | मावळ तालुक्यातील पोलीस पाटील पदांसाठी बुधवारी आरक्षण सोडत, 47 गावांसाठी होणार भरती

by sachinsitapure
Police Patil Recruitment

वडगाव मावळ : सरकारसत्ता ऑनलाईन – Police Patil Recruitment | पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील (Maval Taluka) रिक्त असलेल्या वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे या शहरांसह 47 गावच्या पोलीस पाटील पदांच्या नियुक्तीची (Police Patil Recruitment) प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि.30) पोलीस पाटील पदांच्या नियुक्तीची आरक्षण सोडत काढण्यात (Reservation) येणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले (Sub Divisional Officer Surendra Navale) यांनी दिली.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मावळ तालुक्यातील 47 व मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) 49 अशी एकूण 96 रिक्त असलेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रिया (Police Patil Recruitment) सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार मावळ तालुक्यातील पोलीस पाटील पदांची आरक्षण सोडत येत्या बुधवारी (दि.30) सकाळी 11.30 वाजता बावधन येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय, पुणे विभागीय महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे होणार असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मावळ तालुक्यातील ‘या’ गावांसाठी होणार भरती

नवलाख उंबरे, जांभवडे, मंगरूळ, शिरे, कातवी, बोरिवली, वडेश्वर, घोणशेत, राखसवाडी, कुसगाव खु.,
कुणे ना.मा., सदापुर, खामशेत, वेल्हवळी, शिलाटणे, बोरज, दुधिवरे, मालेवाडी, आपटी,
गेंवडे आपटी, आतवण, आंबेगाव, महागाव, येळसे, कडधे, बेडसे, करुंज,
ब्राम्हणवाडी (बऊर), भडवली, पानसोली, कोळेचाफेसर, तुंग, माजगाव, आंबी, सोमाटणे, दारुंब्रे,
चांदखेड, डोणे, पाचाणे, कुसगांव पमा, वडगाव मावळ, खडकाळा, कुसगाव बु, वलवण,
तुंगार्ली, भुशी, तळेगाव दाभाडे या गावांचा समावेश आहे.

Related Posts