IMPIMP

Pune Crime News | पुणे एअरपोर्ट येथे नोकरी देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक, विश्रांतवाडी परिसरातील घटना

by sachinsitapure
Cheating Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुणे एअरपोर्ट (Pune Airport) येथे नोकरी देण्याचे आमिष दाखवून (Lure of Job) सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) एका 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Crime News) एप्रिल 2023 ते 5 जून 2023 या कालावधीत विश्रांतवाडी येथे घडला आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत अॅलविन अरुमानायगम मोसेस Alvin Arumanaigam Moses (वय-60 रा. मार्थोमा चर्चजवळ, धानोरी, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 7039172297, 9004196595, 9356879595 व 9702103585 या मोबाईल धारकांवर आयपीसी 420, 34, आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे एअरपोर्ट येथे सिक्युरिटी गार्ड (Security Guard) व अॅडमीनमध्ये (Admin) चांगल्या पदावर नोकरी असल्याचे सांगून आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. आरोपींनी फिर्यादी यांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. नोकरीला लावण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी यांना ऑनलाईन पैसे भरण्यास सांगितले.
फिर्यादी यांनी मोबाईल धारकांवर विश्वास ठेवून 2 लाख 98 हजार 700 रुपये पाठवले.
पैसे पाठवून देखील आरोपींनी नोकरी दिली नाही तसेच पैसे परत केले नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता.
या तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी आरोपींवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे भालचंद्र ढवळे (PI Bhalchandra Dhavle) करीत आहेत.

Related Posts