IMPIMP

Pune Crime News | फ्लॅटचा ताबा न देता ज्येष्ठ महिलेची फसवणूक, दोघांवर FIR; विश्रांतवाडी परिसरातील प्रकार

by sachinsitapure
Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | घराचा व्यवहार केल्यानंतर घराचा ताबा न देता एका 65 वर्षीय महिलेची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याचा प्रकार पुण्यातील टिंगरे नगर रोड परिसरात घडला आहे. याप्रकरणी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime News) गंगोत्री अपार्टमेंट, टिंगरे नगर रोड येथे जुन 2011 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत घडला आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याप्रकरणी किवळे देहूरोड येथे राहणाऱ्या 65 वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विकास वाघमारे Vikas Waghmare (वय-30 रा. निगडी, तळवडे), गुड्डू शेख Guddu Shaikh (वय- 40 रा. वानवडी) यांच्यावर आयपीसी 406, 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना फ्लॅटची जुन 2011 मध्ये विक्री केली आहे.
फिर्यादी यांनी फ्लॅटचा व्यवहार करुन आरोपींना 15 लाख रुपये दिले आहेत.
महिलेकडून पैसे घेतल्यानंतर आरोपींनी फ्लॅटचा ताबा दिला नाही.
तसेच महिलेला नवीन घर घेऊन देतो असे सांगून अद्याप घर दिले नाही.
फिर्यादी यांनी आरोपींना दिलेले पैसे ही परत केले नाहीत. घराबाबत विचारणा केली असता दोघांनी टाळाटाळ केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला.
तक्रार अर्जाची चौकशी करुन दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पुणे एअरपोर्ट येथे नोकरी देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक, विश्रांतवाडी परिसरातील घटना

कोंढवा: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍यास जाब विचारणाऱ्या आईला धमकी; रोड रोमिओविरोधात गुन्हा दाखल

 येरवडा: तुझ्याशिवाय जगू शकणार नाही असे म्हणत शाळकरी मुलीवर बलात्कार

 लोणी काळभोर: तलवारीचा धाक दाखवून उभा चिरण्याची धमकी; खंडणी मागणार्‍या गुंडाला अटक

आई पासून दुरावलेला 8 वर्षांचा मुलगा सोशल मीडियामुळे दोन तासात आईच्या कुशीत, मुंढवा पोलिसांची कामगिरी

Related Posts