IMPIMP

Police Sub Inspector (PSI) Death In Accident | दुर्देवी ! भरधाव कार उलटल्याने पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू, इतर दोघे गंभीर जखमी

by nagesh
Police Sub Inspector (PSI) Death In Accident | Nagpur City Police PSI Nilakant Dangde Dead In Car Accident On Hingoli Nanded Road

हिंगोली : सरकारसत्ता ऑनलाईन –  Police Sub Inspector (PSI) Death In Accident | ड्रायव्हरचा कारवरील ताबा सुटल्याने कार उलटून झालेल्या भीषण अपघातात पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला आहे तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना हिंगोली-नांदेड मार्गावरील (Hingoli Nanded Road) माळेगाव पुलाच्या समोर शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (Police Sub Inspector (PSI) Death In Accident)

पोलिस उपनिरीक्षक निळकंठ दंगडे असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. कारमधील शिवाजी गायकवाड आणि गजानन राठोड हे जखमी झाले आहेत. निळकंठ दंगडे हे नागपूर शहर पोलिस दलात (Nagpur City Police) पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. दोनच वर्षांपुर्वी ते खात्यांतर्गत परीक्षा देवून ते पोलिस उपनिरीक्षक झाले होते. ते मुळचे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील जामगव्हाणचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

निळकंठ हे सध्या प्रशिक्षणासाठी एसआरपी कॅम्प येथे आले होते. कामानिमित्त पोलिस उपनिरीक्षक निळकंठ दंगडे, शिवाजी गायकवाड आणि गजानन राठोड हे हिंगोलीहून आखाडा बाळापूरकडे कारने जात होते. त्यावेळी हिंगोली-नांदेड मार्गावरील माळेगाव पुलाच्या समोर ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने कार उलटली. कारमधील तिघेही जखमी झाले.

अपघाताची खबर मिळाल्यानंतर कळमनुरी पोलिस स्टेशनमधील पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे
(Police Inspector Vaijnath Munde) आणि त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी जखमींना तात्काळ उपजिल्हा रूग्णालयात नेले.
तेथील डॉक्टरांनी फौजदार निळकंठ दंगडे यांना तपासून मृत घोषित केले.
दरम्यान जखमी झालेल्या शिवाजी गायकवाड आणि गजानन राठोड यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी हिंगोली आणि नांदेडकडे रवाना करण्यात आले आहे.

Web Title : Police Sub Inspector (PSI) Death In Accident | Nagpur City Police PSI Nilakant Dangde Dead In
Car Accident On Hingoli Nanded Road

Related Posts