IMPIMP

Shishir Shinde Resign Shivsena UBT | …म्हणून शिशिर शिंदेंनी केला ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

by nagesh
Shishir Shinde Resign Shivsena UBT | shivsena ubt leader shishir shinde resign letter to uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन –  Shishir Shinde Resign Shivsena UBT | शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी अखेर ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे पत्र त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे सुपूर्द केले आहे. दरम्यान राजीनामा देताना शिशिर शिंदेंनी खंत व्यक्त केली आहे. (Shishir Shinde Resign Shivsena UBT)

शिवसेनेत (ठाकरे गट) मला हवे तसे काम मिळत नसल्याने मी राजीनामा देत असल्याची खंत शिशिर शिंदे यांनी पत्रात व्यक्त केली आहे. ‘चार वर्षांच्या कालावधीत माझे कर्तृत्व, संघटन कौशल्य, हातात घेतलेले काम फत्ते करण्याची जबरदस्त जिद्द, समाजाच्या विविध क्षेत्रात असलेले जिव्हाळ्याचे संबंध या सर्व बाबी दुर्लक्षित करण्यात आल्या याची मला खंत वाटते. चार वर्षात माझे नेतृत्व आणि कौशल्याकडे ठाकरे गटाने दुर्लक्ष केले आहे. माझी घुसमत मी थांबवतो,’ असे शिशिर शिंदे यांनी म्हटले.

पुढे त्यांनी पत्रात म्हटले आहे, की ‘माझ्या जीवनातली चार अमूल्य वर्षे फुकट गेली अशी माझी धारणा आहे. 30 जून 2022 रोजी माझी शिवसेना उपनेते म्हणून नियुक्ती अचानकपणे झाली. जबाबदारी नसलेले शोभेचे पद मिळाले.’ दरम्यान, शिशिर शिंदे हे 2009 ला भांडुप विधानसभा मतदार संघातून (Bhandup West Assembly Constituency) आमदारपदी निवडून आले होते. त्यानंतर 2014 साली झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

शिशिर शिंदे 19 जून 2018 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून (MNS) शिवसेनेत परतले होते.
2018 मध्ये शिवसेनेत प्रवेश करताना ते भावूक झाले होते.
‘उद्धव ठाकरे यांचा हातात हात घेतल्यानंतर मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा स्पर्श होत असल्याचे वाटते.
वयाच्या 17 व्या वर्षी एका हातात धोंडा, तर दुसऱ्या हातात भगवा झेंडा घेऊन शिवसेनेत सहभागी झालो होतो. मात्र, त्यानतंर मनसेत गेलो,
पण मनसेत असताना मी शिवसेनेबाबत जे काही बोललो असेल त्याबाबत माफ करा.
मोठ्या मनाने मला पुन्हा शिवसेनेत प्रवेश दिल्याने मी आभारी आहे.
आता पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा सर्वत्र फडकवण्यासाठी त्याच हिमतीने मी कामाला लागणार असून,
शिवसेनेचा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही, असे त्यांनी त्यावेळी म्हटले होते.

Web Title : Shishir Shinde Resign Shivsena UBT | shivsena ubt leader shishir shinde resign letter to uddhav thackeray

Related Posts