IMPIMP

Police Suspended | शिक्रापूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार निलंबित

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन   – फसवणुकीच्या (Fraud) गुन्ह्याचा तपासात निष्काळजीपणा आणि तक्रारदार यांच्याकडे पैशांची मागणी केल्या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यातील (Shikrapur Police Station) पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुपीउद्दीन चमनशेख (Police Constable Amiruddin Rupiuddin Chamanshekh) यांचे पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) अधीक्षक अभिनव देशमुख (Abhinav Deshmukh) यांनी निलंबन (Police Suspended) केले आहे. चमनशेख यांच्या निलंबनाचे (Police Suspended) आदेश मंगळवारी (दि.27) काढण्यात आले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये एका तक्रारदाराने 2 लाख 70 हजार रुपयांची फसवणुक झाल्याबाबत तक्रारीअर्ज दाखल केला होता. हा तक्रारी अर्ज (Complaint Application) चौकशीसाठी (Inquiry) पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख, यांचेकडे प्रभारी अधिकारी शिक्रापुर पोलीस ठाणे यांनी दिलेला होता, परंतु या तक्रारी अर्जावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अर्जदार यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार केली होती. तसेच पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख यांनी पैशाची मागणी (Demand Money) केली असल्याबाबत व्हिडीओ देखील दिला होता.

 

पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख यांनी संबंधित अर्जाच्या चौकशी संदर्भात संशयास्पद वर्तन करुन आर्थिक फायदा मिळावा यासाठी अर्जाची चौकशी प्रलंबित ठेवल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तसेच अर्जदार यांना पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख यांनी पैशाची मागणी करुन शासकिय सेवकास अशोभनीय असे गैरवर्तन करून महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम (Maharashtra Civil Service Act) 1979 मधील नियम क्रमांक 3 चे उल्लंघन केले. तसेच शासकिय सेवेत दाखवलेल्या बेशिस्त, बेजबाबदार व पोलीस खात्याला अशोभनीय अश्या वर्तनाबद्दल चमनशेख यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात आली आहे. पोलीस हवालदार अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख, यांना शिस्तभंगविषयक कार्यवाहीच्या अधीन राहुन सेवेतुन निलंबित करण्यात आले असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

 

अमीरुद्दीन रुफीउद्दीन चमनशेख यांनी नियमांचे उल्लंघन (Violation of Rules) केले आहे.
त्यामुळे पुणे पोलीस (Pune Police) खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे.
निलंबन कालावधीत खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही.
तसेच मुख्यालय (Police Headquarter) सोडता येणार नाही.
निलंबन (Police Suspended) कालावधीत पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण यांचेकडे नियमानुसार सकाळ व
संध्याकाळी असे दिवसातून दोनवेळा हजेरी लावणे देखील बंधनकारक असणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Police Suspended | Police constable of Shikrapur police station suspended

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पतीचा बनावट मृत्यु दाखला सादर करुन पत्नीने केली स्वत:च्या नावावर जमीन

Ajit Pawar | छगन भुजबळांचे ’ते’ मत वैयक्तिक, पक्षाची भूमिका नाही; अजित पवारांनी केला खुलासा

Worst Foods For Heart | हृदयाचे ’शत्रू’ आहेत ‘हे’ 5 फूड्स, हार्ट अटॅकला देतात निमंत्रण

 

Related Posts