IMPIMP

Ajit Pawar | छगन भुजबळांचे ’ते’ मत वैयक्तिक, पक्षाची भूमिका नाही; अजित पवारांनी केला खुलासा

by nagesh
Chagan Bhujbal | chhagan bhujbal reaction on rahul gandhi savarkar statement

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Ajit Pawar | शाळांमध्ये महापुरूषांच्या फोटोएवजी लावण्यात येणार्‍या देवी-देवतांच्या फोटोवरून राष्ट्रवादीचे नेते (NCP Leader) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नुकतेच एक वक्तव्य केले होते. यावरून भाजपा (BJP) आणि काही ब्राह्मण संघटनांनी (Brahmin Organization) आक्षेप घेत निषेध नोंदवला होता. आता राष्ट्रवादीने सुद्धा हात झटकले असून ते भुजबळ यांचे वैयक्तिक मत होते, ती राष्ट्रवादीची भूमिका नाही, असे म्हटले आहे. हा खुलासा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, छगन भुजबळ यांचे वक्तव्य वैयक्तिक आहे हे पक्षाने स्पष्ट केले आहे. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. पक्षाची ती भूमिका नाही. भुजबळांनी त्यांची भूमिका मांडली आहे. राज्यात आज बेरोजगारी, महागाईचा प्रश्न आहे. वेदांतासारखा प्रकल्प महाराष्ट्रातून गेला. त्यामुळे दीड-दोन लाख तरूणांना रोजगारापासून मुकावे लागले आहे. त्याबाबत सत्ताधार्‍यांनी बोलले पाहिजे.

 

आपल्या भाषणात छगन भुजबळ म्हणाले होते की, शाळेत सावित्रीबाई फुले (Savitribai Phule), महात्मा फुले (Mahatma Phule), छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj), बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar), कर्मवीर भाऊराव पाटलांचा (Karmaveer Bhaurao Patil) फोटो लावा. सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही पाहिलं नाही. ज्यांनी शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर ते फक्त 3 टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची?

 

भुजबळ म्हणाले, ज्यांच्यामुळे तुम्हाला शिक्षण मिळालं, अधिकार मिळाला त्यांची पूजा करा.
हे तुमचे देव असले पाहिजेत. यांना देव मानून पूजा केली पाहिजे. त्यांच्या विचारांची पूजा केली पाहिजे.
बाकीचे देव वैगेरे नंतर बघूया.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यानंतर भाजपा आणि काही ब्राह्मण संघटनांनी आक्षेप नोंदवला होता.
भाजपा नेते राम कदम (BJP Leader Ram Kadam) यांनी म्हटले की,
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आमचे देव आणि देवतांबद्दल इतकी चीड का? हा खरा सवाल आहे.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की,
शाळेतून सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाही, कोणाला काय वाटेल ते करणार नाही.
जे लोकांना वाटते, तेच आम्ही करणार.

 

 

Web Title :- Ajit Pawar | it is a personal opinion not a party stand ncp ajit pawar statement over chhagan bhujbals controversial statement

 

हे देखील वाचा :

Dhananjay Munde | पंकजा मुंडे यांच्याबाबत धनंजय मुंडे म्हणाले – आमच्यात भाऊ-बहिणीचे नाते राहिले नाही, राजकारणात एकमेकांचे…

Ajit Pawar | त्याबद्दल मला प्रशिक्षण मिळेल का आणि ते मोफत की फी लागणार? अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Maharashtra Politics | NCP च्या महिला नेत्याचा BJP मध्ये प्रवेश, बारामतीमध्येच शरद पवारांना मोठा धक्का!

 

Related Posts