IMPIMP

Post Office Gram Suraksha Yojana | केवळ 50 रुपये जमा करा, पोस्ट ऑफिसच्या ‘या’ सुपरहिट स्कीमध्ये मिळतील 35 लाख; जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Post Office | if you have invested in the post office then settle this work before april 1 otherwise you not get interest

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Post Office Gram Suraksha Yojana | भारतीय पोस्ट ऑफिस विभाग आपल्या ग्राहकांना सुविधा देण्यासाठी वेळोवेळी विविध योजना जारी करत असतो. अशीच एक योजना पोस्ट ऑफिसने सुरू केली आहे, तिचे नाव आहे ग्राम सुरक्षा योजना (Post Office Gram Suraksha Yojana). तुम्हालाही गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवायचा असेल तर ही योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या योजनेत ग्राहक कमी पैसे गुंतवून लाखो कमावू शकतात. काय आहे ही पोस्ट ऑफिस स्कीम जाणून घेऊयात…

 

भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवणे खूप सुरक्षित मानले जाते. शिवाय पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना बँकेपेक्षा जास्त टक्के व्याज देते. भारत पोस्ट ऑफिसची बचत योजना ग्राहकांना सुरक्षित आणि उत्तम रिटर्न देण्यासाठी खूप चांगली मानली जाते.

 

इतके रूपये जमा केल्यावर मिळतील 35 लाख रुपये

पोस्ट ऑफिसच्या ग्राम सुरक्षा योजनेंतर्गत ग्राहकांना चांगला रिटर्न मिळू शकतो. या योजनेत कमी जोखीम आहे.

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत, तुम्हाला दररोज 50 रुपये जमा करावे लागतील, म्हणजे 1500 रुपये दरमहा. नियमित वेळेपर्यंत रक्कम जमा केल्यानंतर तुम्हाला 31 ते 35 लाखांचा लाभ मिळेल.

जाणून घ्या पोस्ट ऑफिस योजनेचे नियम

देशातील कोणत्याही नागरिकाला पोस्ट ऑफिस योजनेचा लाभ मिळू शकतो.

19 ते 55 वयोगटातील अर्जदार या योजनेत गुंतवणूक करू शकतात.

ग्राहक या प्लॅनचा प्रीमियम महिना, त्रैमासिक, 6 महिने किंवा वर्षभरात भरू शकतात.

योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान विमा रक्कम 10 हजार ते 10 लाख रुपये असेल.

अर्जदाराला प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिला जातो.

या योजनेत टपाल कार्यालयाकडून ग्राहकांसाठी कर्ज घेण्याची सुविधाही देण्यात आली आहे.

ही योजना 3 वर्षात सोडू शकता, परंतु तुम्हाला याचा कोणताही लाभ मिळणार नाही.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

किती फायदा होईल
जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 19 व्या वर्षी योजनेत गुंतवणूक केली आणि 10 लाखांची पॉलिसी घेतली. तर त्याचा मासिक हप्ता 55 वर्षांसाठी 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. (Post Office Gram Suraksha Yojana)

 

यासोबतच, मॅच्युरिटीनंतर, 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपयांचा लाभ मिळेल. (Post Office Super Hit Scheme)

 

कर्जाचा लाभ मिळेल
या योजनेअंतर्गत तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता. याशिवाय ग्राहकांना जीवन विम्याचा लाभ मिळतो. परंतु पॉलिसी खरेदीची 4 वर्षे पूर्ण झाल्यावरच तुम्हाला कर्ज घेण्याचा लाभ मिळू शकतो.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Post Office Gram Suraksha Yojana | post office super hit scheme Post Office Gram Suraksha Yojana

 

हे देखील वाचा :

LIC Jeevan Labh Policy | एलआयसीची ‘ही’ योजना दररोज 260 रुपयांच्या गुंतवणुकीवर 20 लाख रुपये देईल, जाणून घ्या अटी आणि नियम

Makar Sankranti 2022 | मकर संक्रांतीचे पौराणिक महत्त्व काय आहे? या दिवशी भीष्म पितामह यांनी केला होता देह त्याग

Makar Sankranti 2022 | मकर संक्रांत 14 किंवा 15 जानेवारीला कधी आहे? जाणून घ्या पूजेचे विधी

 

Related Posts