IMPIMP

Post Office Monthly Income Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ आहे जबरदस्त योजना ! दरमहा होईल चांगले उत्पन्न; जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Post Office Franchise | post office franchise best investment scheme for business

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Post Office Monthly Income Scheme | भारतीय पोस्ट ऑफिस (Post Office MIS) आपल्या ग्राहकांना अनेक योजना आणत असते. त्यामधून ग्राहकांना फायदा होतो. पोस्ट ऑफिस ही सुरक्षित गुंतवणुकीसाठीची (Investment) योजना आहे. त्यामुळे अधिकतर लोक याकडे वळताना दिसत असतात. दरम्यान, सरकारच्या पाठिंब्यामुळे लोकांचा या योजनांवर जादा विश्वास आहे. तसेच, त्यामध्ये परतावाही निश्चित (Post Office Monthly Income Scheme) आहे. त्यामुळे, यात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला परिपक्वतेवर किती पैसे मिळतील हे माहीत असते. याबाबत जाणून घेणे आवश्यक आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (Post Office Monthly Income Scheme) ही देखील अशीच एक योजना आहे ज्यात हमी परतावा उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये वार्षिक 6.6 टक्के व्याज मिळते. ही योजना 5 वर्षांनी परिपक्व होते. याचा अर्थ 5 वर्षानंतर तुम्हाला मासिक उत्पन्नाची हमी मिळू लागेल. 5 वर्षांनी ती आणखी 5 वर्षांसाठी वाढवता येईल. त्याचबरोबर जर खातेदार मॅच्युरिटी पूर्वी मरण पावला, तर पैसे नॉमिनीला दिले जातील. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत केवळ 1 हजार रुपयांमध्ये खाते उघडता येते.

 

मासिक उत्पन्न किती ?

मासिक उत्पन्न योजनेमध्ये 6.6 टक्के वार्षिक व्याज दिले जातेय.
समजा एखाद्या गुंतवणूकदाराने यात 9 लाख रुपयांची गुंतवणूक संयुक्त खात्याच्या माध्यमातून केली असेल तर त्याला वार्षिक 6.6 टक्के दराने 59 हजार 400 रुपये मिळतील.
एका महिन्याच्या आधारे पाहिल्यास ते 4 हजार 950 रुपये आहे.
हे गुंतवणूकदार दर महिन्याला घेऊ शकतात. ही केवळ व्याजाची रक्कम आहे, गुंतवणूकदाराची मूळ रक्कम तेवढीच राहणार आहे.

 

किती आणि कोण करेल गुंतवणूक ?

 या योजनेअंतर्गत एकल आणि संयुक्त दोन्ही खाती उघडता येतात.

 यामध्ये एक व्यक्ती एका खात्यात अधिकाधिक 4.5 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात अधिकाधिक 9 लाख रुपये गुंतवू शकते.

 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेला कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूकदार एका वर्षापूर्वी ठेवी रक्कम काढू शकत नाही.
त्याचबरोबर, समजा मुदतपूर्ती कालावधी पूर्ण होण्यापूर्वी म्हणजेच 3 ते 5 वर्षांच्या दरम्यान पैसे काढले गेले,
तर ते वजा केल्यावर मूळ रकमेपैकी 1 टक्के परत केला जाईल.
दुसरीकडे, जर तुम्ही मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर पैसे काढले तर तुम्हाला योजनेचा पूर्ण नफा होणार आहे.

 

Web Title :- Post Office Monthly Income Scheme | post office monthly incomes scheme know eligibility and how to much to invest for good returns

 

हे देखील वाचा :

Maharashtra MLC Election 2022 | राष्ट्रवादीची शिवसेनेवर कुरघोडी’; भाजप नेते प्रविण दरेकरांचा आरोप

Maharashtra MLC Election 2022 | विधान परिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग ! शिवसेना-राष्ट्रवादीकडे पुरेसे संख्याबळ; भाजप, काँग्रेसची अडचण, गणित कसं जुळणार?

Pune Crime | वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना व्याजाने पैसे देऊन वसुलीसाठी मारहाण; खासगी सावकार गजाआड

 

Related Posts