IMPIMP

Maharashtra MLC Election 2022 | विधान परिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग ! शिवसेना-राष्ट्रवादीकडे पुरेसे संख्याबळ; भाजप, काँग्रेसची अडचण, गणित कसं जुळणार?

by nagesh
Maharashtra MLC Election 2022 | Maharashtra vidhan parishad election shiv sena and ncp have sufficient strength bjp congresss problem how to match the equation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra MLC Election 2022 | राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीची (Maharashtra MLC Election 2022) रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या 20 जून रोजी ही निवडणुक होणार आहे. या पार्श्वभूमीवर आप आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच पक्षाच्या जोरदार हालचाली पाहायला मिळत आहे. अशातच एकिकडे पाचवी जागा जिंकण्यासाठी भाजप (BJP) रणनीती आखत आहे. तर काँग्रेस (Congress) आपली दुसरी जागा निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

एकिकडे भाजप पाच जागा जिंकण्याचा निर्धार करत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) देखील आपले सहाच्या सहा उमेदवार निवडून येणार असा दावा करताना दिसत आहे. अशातच आता विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपची खेळी पुन्हा यशस्वी ठरणार का? याबाबत चर्चा होताना दिसत आहे. सध्या भाजपकडे पाचवी जागा निवडून येण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. तसेच कांग्रेसकडेही दुसरी जागा निवडुन येण्यासाठी संख्याबळ नाही. अशातच त्यांना अगदी कसोशीने प्रयत्न करावे लागणार हे नक्कीच. (Maharashtra MLC Election 2022)

 

काँग्रेसचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan)
यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा केली आहे.
कोणाकडे निवडणुकीचे कौशल्य आहे आणि कोणाकडे नाही, हे निकालामध्ये कळेलच,
असे आव्हान पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आधीच दिले आहे.

 

दरम्यान, विधान परिषदेची निवडणूक ही गुप्त मतदाना पद्धनीनुसार असल्याने भाजप पेक्षा महाविकास आघाडीमध्ये चिंतेचं वारं पसरलं आहे.
आघाडीचे सहा उमेदवार निवडुन येण्यासाठी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष कामाला लागले आहेत.
त्याचबरोबर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आपल्या आमदारांना हाँटेलमध्ये ठेवणार असल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे.
तर दुसरीकडे भाजप आपल्या आमदारांना ताज हाॅटेलमध्ये ठेवणार आहे.
दरम्यान, एवढ्या हालचालीवरून विधान परिषद निवडणुकीत कोणाची सरशी आणि कोणाची गोची होणार? हे पाहावे लागणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :-  Maharashtra MLC Election 2022 | Maharashtra vidhan parishad election shiv sena and ncp have sufficient strength bjp congresss problem how to match the equation

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना व्याजाने पैसे देऊन वसुलीसाठी मारहाण; खासगी सावकार गजाआड

Maharashtra MLC Election | ‘भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील, महाविकास आघाडीतील एकाची विकेट पडेल’ – चंद्रकांत पाटील

Modi Government | बोगस मतदान रोखण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय ! मतदान ओळखपत्र आधारशी लिंक करावं लागणार

 

Related Posts