IMPIMP

Pradeep Sharma | एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची प्रकृती बिघडली, ससून रुग्णालयात दाखल

by nagesh
 Pradeep Sharma | Encounter specialist Pradeep Sharma's condition deteriorated, Sassoon admitted to hospital

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन एन्काऊंटर स्पेशालिस्ट (Encounter Specialist) आणि मनसुख हिरेन खून प्रकरणात (Mansukh Hiren Murder Case) अटक करण्यात आलेले प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) हे सध्या पुण्यातील येरवडा कारागृहात (Yerawada Jail in Pune) आहेत. कारागृहात प्रदिप शर्मा (Pradeep Sharma) यांची प्रकृती बिघडल्याने (Health Deteriorated) त्यांना ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) दाखल करण्यात आले आहे. गेल्यावर्षी शर्मा यांना अटक (Arrest) करण्यात आली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उद्योगपती मुकेश अंबानी (Businessman Mukesh Ambani) यांच्या मुंबईतील अँटिलिया स्फोटके ठेवल्या प्रकरणी (Antilia Explosives Case) आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मांना (Pradeep Sharma) गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे प्रदिप शर्मा यांना मुंबईतील ऑर्थर रोड (Arthur Road in Mumbai) कारागृहातून येरवडा कारागृहात हलवण्यात आले होते. गेल्या 10-12 दिवसांपूर्वी त्यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सोनोग्राफी करण्यासाठी आणि पुढील उपचारासाठी शर्मा यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

उपचारानंतर त्यांना पुन्हा कारागृहात नेण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने पुन्हा ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांच्या वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, मुकेश अंबानी घराबाहेर सापडलेली स्फोटके सापडल्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला. हिरेन यांची हत्या झाल्याचे समोर आले. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेतील (Mumbai Crime Branch) पोलीस अधिकारी सचिन वाझे (Police Officer Sachin Vaze) आणि प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली.

 

कोण आहेत प्रदीप शर्मा ?

– प्रदीप शर्मा 1983 मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले
पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख
312 गुंडांचा प्रदीप शर्मा यांच्याकडून एन्काऊंटर
कुख्यात गुंडांशी त्यांचा संबंध असल्याचाही आरोप
2008 मध्ये पोलीस दलातून निलंबन
2017 मध्ये आरोपांमध्ये क्लीनचिट
2017 मध्ये त्यांनी दाऊदच्या भावाला अटक केली.
2019 मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा
नालासोपाऱ्यातून शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढवली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pradeep Sharma | Encounter specialist Pradeep Sharma’s condition deteriorated, Sassoon admitted to hospital

 

हे देखील वाचा :

Tamilnad Mercantile Bank | गुंतवणुकदारांसाठी मोठी संधी ! पुढील आठवड्यात खुला होत आहे ‘या’ 100 वर्ष जुन्या बँकेचा IPO

PM Kisan Yojana | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! KYC बाबत आली मोठी अपडेट, जाणून घ्या आता नवीन डेडलाईन

Multibagger Stock | TATA Group च्या 3 रुपयांच्या शेअरचा जबरदस्त रिटर्न, एक लाखाचे केले 169 कोटी

 

Related Posts