IMPIMP

Pune Accident | हडपसर-सासवड रोडवर कंटेनर व शिवशाही बसचा भीषण अपघात

by nagesh
Pune Accident | Horrible accident involving container and Shivshahi bus on Hadapsar-Saswad road

पुणे  : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Accident |  उरुळी देवाची हद्दीत सासवड रोडवर शिवशाही एसटी बस (Shivshahi ST Bus) आणि कंटेनरची (Container) धडक झाली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात (Pune Accident)  रविवारी (दि.18) मध्यरात्री 12:29 वाजता सासवड रस्ता (Saswad Road), ऊरळी देवाची, हॉटेल सोनाई जवळ झाला. अपघातात काही जण जखमी असून गाडीमधे अडकले असल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर  काळेबोराटे नगर अग्निशमन केंद्रातील (Kaleborate City Fire Station) जवान घटनास्थळी दाखल झाले. मृत व्यक्ती कंटेनर चालक असल्याची माहिती मिळत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

घटनास्थळी पोहोचताच अग्निशमन अधिकारी अनिल गायकवाड (Anil Gaikwad) यांनी नियंत्रण कक्षास कळविले की, या ठिकाणी शिवशाही बस (MH14 GO 3104) पंढरपुर-स्वारगेट व कंटेनर (MH18 AA 7190) यांचा मोठा अपघात झाला असून दलाची मदत पोहोचण्यापूर्वी शिवशाही बसमधील 4 जखमींना नागरिकांनी बाहेर काढून जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवले होते. तर कंटेनर ड्रायव्हर याला देखील रुग्णालयात दाखल केले.

 

दलाच्या जवानांनी पाहणी केली असता शिवशाही बसमधे ड्रायव्हर सीटमागे एक जखमी व्यक्ती अडकला होता.
तात्काळ अग्निशमन उपकरण फायर एक्स वापरत पाचच मिनिटात सीटवर अडकलेल्या व्यक्तीची सुटका करून त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविले.
घटनास्थळी क्रेनच्या मदतीने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली.
अपघाताचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

घटनास्थळी एकूण जखमी व्यक्ती 6 असून काळेबोराटे नगर, कोंढवा बुद्रुक व अग्निशमन मुख्यालय येथील रेस्क्यु व्हॅन अशी 3 अग्निशमन वाहने वेळेत दाखल झाली होती.
अपघाताचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Accident | Horrible accident involving container and Shivshahi bus on Hadapsar-Saswad road

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पोलिसाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; विमाननगर परिसरातील घटना

Punit Balan Group | टेनिसपटू अंकिता रैना आणि पुनीत बालन ग्रुपमध्ये सामंजस्य करार

Ajit Pawar | मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे सरकारची बेफिकीरी आणि अनास्था संतापजनक – अजित पवार

 

Related Posts