IMPIMP

Pune Crime | पोलिसाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; विमाननगर परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | रस्त्यात लावलेली गाडी बाजूला घेण्यावरुन झालेल्या वादात पोलिसाच्या (Pune Police) डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारुन टोळक्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. (Pune Crime)

याप्रकरणी पोलीस नाईक पी आर मोटे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३५८/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कालीदास खांदवे (वय ३५, रा. राखपसरे वस्ती, लोहगाव), माऊली खांदवे (रा. लोहगाव) व त्यांच्या तीन साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना लोहगावमधील (Lohegaon) जगदगुरु पेट्रोलपंपाजवळ रविवारी सकाळी सव्वा दहा वाजता घडली. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोटे हे कारमधून प्रतिक मटण शॉप येथे मटण घेण्यासाठी गेले होते.
त्यावेळी त्यांनी आपली कार पार्क केली. तेव्हा कालीदास खांदवे याने त्यांना गाडी बाजूला घे, असे सांगितले.
त्यावर मोटे यांनी मी पोलीस आहे़ थांब जरा असे सांगितले.
त्यानंतर दोघांनी त्यांच्याकडील मोटारसायकल आडवी लावून मोटे यांच्याबरोबर हुज्जत घातली.
खांदवे याने फोन करुन साथीदारांना बोलावले.
मोटे यांना मारहाण करुन त्यांच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक मारुन गंभीर जखमी केले.
सहायक पोलीस निरीक्षक लहाने तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | An attempt to kill a policeman by putting a cement block on his head; Incidents in Airport area

 

हे देखील वाचा :

Punit Balan Group | टेनिसपटू अंकिता रैना आणि पुनीत बालन ग्रुपमध्ये सामंजस्य करार

Ajit Pawar | मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे सरकारची बेफिकीरी आणि अनास्था संतापजनक – अजित पवार
NCP National Executive Committee | राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर ! जितेंद्र आव्हाडांवर मोठी जबाबदारी; नबाव मलिकांना डच्चू

 

Related Posts