IMPIMP

Pune Balewadi Crime | WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या बालेवाडी येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 11 मुलींची सुटका (Video)

by sachinsitapure
SS Cell Pune-Prostitution Racket Bust

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Balewadi Crime | बालेवाडी (Balewadi) परिसरातील हॉटेल व अपार्टमेंट मध्ये व्हाट्सअपद्वारे (ऑनलाईन) चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा (Prostitution Racket) गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell Pune) पर्दाफाश केला आहे (Pune Crime Branch). या कारवाईत उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील 11 तरुणींची सुटका करण्यात आली आहे. तर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात राहुल मदन उर्फ मदन सन्यासी आणि रॉकी कदम, दिनेश उर्फ मामा, नवीन, रोषन (पूर्ण नाव पत्ता महित नाही) यांच्या विरुद्ध आयपीसी 370, 34 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस हवालदार मनिषा सुरेश पुकाळे यांनी फिर्याद दिली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.24) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हॉटेल टॅग हाऊस, पॅनकार्ड क्लब रोड वरील स्नेह अपार्टमेंट आणि लक्ष्मीनगर येथील द विला हॉटेलच्या खोलीत करण्यात आली.

बालेवाडी येथील दोन हॉटेल आणि एका अपार्टमेंटमध्ये व्हॉट्सअपद्वारे (ऑनलाईन) वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला समजली. त्यानुसार पथकाने याठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर मिटकॉन कॉलेजजवळील हॉटेल टॅग हाऊस मधील तीन रुममध्ये छापा टाकला. तसेच स्नेह अपार्टमेंट आणि द विला हॉटेल मधील रुममध्ये छापा टाकून 11 तरुणीची सुटका करण्यात आली.

आरोपींनी हॉटेलमध्ये रूम बुक करुन त्याठिकाणी पीडित मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते. वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल
झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरक्षक भरत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे,
सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, महिला पोलीस उपनिरीक्षक आश्विनी भोसले, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत,
सागर केकान, अमेय रसाळ, बाबासो कर्पे, अजय राणे, तुषार भिवरकर, हनमंत कांबळे, इरफान पठाण, इम्रान नदाफ,
संदिप कोळगे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार, महिला पोलिस अंमलदार मनिषा पुकाळे आणि
रेश्मा कंक यांच्या पथकाने केली आहे.

Related Posts