IMPIMP

Pune BARTI | बार्टीच्या आश्वासनानंतर संशोधक विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

by nagesh
Pune BARTI | After BARTI’s assurance, the protest of research students back off in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune BARTI | डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे कार्यालयासमोर Dr. Babasaheb Ambedkar Research And Training Institute (BARTI) Pune आमरण उपोषणाकरिता बसलेल्या पीएच.डी च्या १७० संशोधक विद्यार्थ्यांचा प्रलंबित असलेला निर्णय मार्गी लावण्याचे आश्वासन महासंचालक सुनील वारे यांनी संशोधन विद्यार्थ्यांची भेट घेऊन दिल्याने मागील ५ दिवसापासून सुरू असलेले आमरण उपोषण संशोधक विद्यार्थ्यांनी मागे घेतले आहे. (Pune BARTI)

एम.फिल ते पीएच.डी. करीता युजीसी व एनएफएससीच्या मार्गदर्शक तत्वानुसार पाच वर्ष कालावधीपर्यंत अधिछात्रवृत्ती देण्याची मागणी संशोधक विद्यार्थ्यांनी बार्टी संस्थेकडे केली . त्या अनुषंगाने २२ मे पासून विद्यार्थी उपोषणास बसले होते. उपोषणकर्त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने बार्टी संस्थेचे महासंचालक सुनील वारे (Sunil Ware) यांनी शुक्रवारी उपोषणकर्ते शरद डुमणे (Sharad Dumane), अरविंद भुक्तर (Arvind Bhuktar) व विकी जंगले (Vicky Jungle) तसेच इतर संशोधन विद्यार्थी यांनी केलेल्या मागणीनुसार सकारात्मक निर्णय घेतला. संशोधन विद्यार्थ्यांना न्याय देऊ असे आश्वासन त्यांनी दिल्याने विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण मागे घेतले. (Pune BARTI)

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

बार्टी संस्थेच्या निबंधक इंदिरा अस्वार (Indira Aswar), योजना विभागाच्या विभागप्रमुख स्नेहल भोसले
(Snehal Bhosale), रविंद्र कदम (Ravindra Kadam), डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण (Dr. Satyendranath Chavan),
प्रकल्प व्यवस्थापक डॉ.सारीका थोरात (Dr. Sarika Thorat), सहायक प्रकल्प व्यवस्थापक, डॉ.अंकुश गायकवाड (Dr Ankush Gaikwad), प्रकल्प अधिकारी समाधान दुधाळ (Samadhan Dudhal), फेलोशिप विभागातील अधिकारी व संशोधन विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

Web Title : Pune BARTI | After BARTI’s assurance, the protest of research students back off in pune

Related Posts