पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune BJP News | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजप (Maharashtra BJP) चांगलीच तयारीला लागली असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. याबाबतची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केली. पुणे शहर जिल्हाध्यक्षपदी (Pune City BJP President) धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी (Pimpri Chinchwad City BJP President) शंकर जगताप (Shankar Jagtap) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Pune News)
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मला खात्री आहे, माझे नवनियुक्त… pic.twitter.com/IsjhbulTz1
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 19, 2023
पुणे ग्रामीण (बारामती) शहराध्यपदी वासुदेव काळे (Vasudev Kale) तर पुणे मावळ शहराध्यपदी शरद बुट्टे पाटील (Sharad Butte Patil) यांची निवड केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्षांची नवी टीम घोषित करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जवळपास 70 नावांची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा (Legislative Assembly) आणि लोकसभेच्या (Lok Sabha) दृष्टीकोणातून भाजपची जोरदार तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
Web Title : Pune BJP News | Dheeraj Ghate appointed as Pune BJP City President and
Shankar Jagtap as Pimpri Chinchwad City President
- NIA ने प्रत्येकी 5 लाखांचे बक्षीस लावलेले फरार 2 अतिरेक्यांना पुणे पोलिसांकडून अटक
- पुनीत बालन ग्रुपच्या अर्जुन कढे आणि अंकिता गोसावींना शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार जाहिर
- पुणे पोलिसांचं ‘कोम्बिंग ऑपरेशन’ ! स्वत: पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ‘फिल्ड’वर
- विद्यार्थी भाडेकरूसाठी लेखी परवानगी मागणाऱ्या सोसायटीला कोर्टाचा दणका
- पुण्यातील धक्कादायक घटना! चोरट्यांनी वेअर हाऊसमधून लंपास केले तब्बल 65 लाखांचे 105 आय फोन