IMPIMP

Pune CoOperative Court | विद्यार्थी भाडेकरूसाठी लेखी परवानगी मागणाऱ्या सोसायटीला कोर्टाचा दणका

सर्वसाधारण सभेतील ठरावाला अंतरिम स्थगिती

by nagesh
Pune CoOperative Court | Students cannot be denied permission to stay in cooperative housing societies, rules Cooperative Court

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune CoOperative Court | सोसायटीच्या लेखी परवानगीखेरीज विद्यार्थी भाडेकरू ठेवायचा नाही, असा नियम करणाऱ्या शहरातील एका गृहनिर्माण सोसायटीला सहकार न्यायालयाने दणका दिला आहे. अशा स्वरूपाच्या ठरावाला अंतिम आदेशापर्यंत स्थगिती देत असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. ‘ऑक्स्फर्ड ऑफ द ईस्ट’ (Oxford Of The East) अशी पुण्याची ओळख असताना, विद्यार्थ्यांना राहण्यासाठी फ्लॅट नाकारणे योग्य ठरणारे नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे. (Pune CoOperative Court)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

वनराज सहकारी गृहनिर्माण संस्थेने (Vanraj Cooperative Housing Society) 17 जुलै 2022 रोजी झालेल्या सर्वसाधारण बैठकीमध्ये विद्यार्थी भाडेकरू ठेवण्याबाबत एक ठराव केला होता. या आठ क्रमांकाच्या ठरावानुसार, सदनिका मालकाने त्याच्या सदनिकेत विद्यार्थी भाडेकरू ठेवण्यापूर्वी सोसायटीची लेखी परवानगी घेणे सक्तीचे करण्यात आले. त्यानंतर ज्यांनी असे भाडेकरू ठेवले, त्यांना नोटिसा बजावून 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत भाडेकरू काढण्यासाठी मुदत याच सर्वसाधारण सभेमध्ये दिली. तसेच मुदतीत विद्यार्थी भाडेकरू नाही काढल्यास, दरमहा दहा हजार रुपये दंड आकारण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. (Pune CoOperative Court)

सोसायटीच्या या ठरावाला, फ्लॅटमालक स्वप्निल ज्ञानोबा अर्थमवार (Swapnil Gyanoba Arthamwar) व इतरांनी सहकार न्यायालयात आव्हान दिले. त्यावर सहकार न्यायालयाचे (क्र. 2) न्यायाधीश ए. एस. वनवे (Judge A. S. Wanve) यांच्यापुढे जुलै 2022 मध्ये सुनावणी झाली.

दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, अर्थमवार आणि इतरांचा अर्ज दाखल करून घेत,
न्या. वनवे यांनी नुकताच तात्पुरता आदेश जारी करताना,
या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन अंतिम आदेश येईपर्यंत संबंधित सोसायटीला ठराव क्र.
आठची अंमलबजावणी करण्यास प्रतिबंध केला आहे.

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. त्यामुळे येथे लाखो विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पुण्याचा उल्लेख ‘ऑक्स्फर्ड ऑफ द इस्ट’ असा केला होता. पुणे हे निसंशय ‘सिटी ऑफ नॉलेज’ आहे. तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्था फ्लॅट देणार नसतील तर ‘सिटी ऑफ नॉलेज’चा हेतू साध्य होणार नाही, असे निरीक्षण न्या. वनवे यांनी आपल्या आदेशात नोंदवले आहे.

Web Title : Pune CoOperative Court | Students cannot be denied permission to stay in cooperative housing societies, rules Cooperative Court

Related Posts