IMPIMP

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात 964 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | In the last 24 hours, the number of new patients in Pune is more than the number of patients recovering from corona, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) रुग्ण संख्या कमी होत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आढळून येत आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 334 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 964 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शहरातील विविध केंद्रावर आज 3 हजार 818 स्वॅब तपासणी (Swab) करण्यात आली आहे. यामध्ये 334 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची (Pune Corona Update) संख्या 6 लाख 57 हजार 517 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 43 हजार 932 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 02 तर हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 333 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 04 हजार 252 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 191 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 30 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 20 रुग्ण आहेत.
एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 12.90 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :-  Pune Corona Update | 964 patients corona free in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Dattatray Bharne | राज्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख

Gold Price Today | सोन्याची विक्रमी दराच्या दिशेने वाटचाल, सोनं पुन्हा 50 हजारांवर, जाणून घ्या आजचा भाव

Pune Crime | धक्कादायक ! पैसे न दिल्याने 28 वर्षाच्या मुलाने 55 वर्षाच्या आईचा केला विनयभंग

 

Related Posts