IMPIMP

Pune Corona | चिंताजनक ! पुणे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 7 हजारांच्यावर, गेल्या 24 तासात 2200 हून अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 12 new corona patients in Pune city in last 24 hours find out other statistics

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनपुण्यात कोरोना बाधित रुग्णांच्या (Pune Corona) संख्येत दिवसेंदिवस वाढ पहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या साडेसात हजारांच्या वर गेली आहे. तर ऑक्सिजनवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची देखील संख्या वाढली आहे. आज दुपारी चार वाजेपर्यंत शहरामध्ये कोरोनाचे (Pune Corona) 2284 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 80 रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PMC Health Department) दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आज पुणे शहरात 15 हजार 775 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये 2284 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज पर्यंत करण्यात आलेल्या एकूण 39 लाख 22 हजार 097 प्रयोगशाळा तपासणीत 5 लाख 16 हजार 778 जणांना कोरोनाची बाधा (Pune Corona) झाली आहे. यापैकी 4 लाख 99 हजार 991 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

शहरात रुग्णांची संख्या वाढत असताना शहरात मृत्यूचे प्रमाण (Fatality Rate) कमी असल्याने दिलासा मिळाला आहे.
आज शहरात 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील तीन आणि शहराबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे.
आजपर्यंत शहरात 9 हजार 122 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या शहरामध्ये 7 हजार 665 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून यामध्ये 106 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. तर 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

 

 

Web Title :- Pune Corona | Worrying! Number of active patients in Pune city over 7000, more than 2200 new patients in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Dangerous Combination With Eggs | अंड्यांसोबत ‘हे’ पदार्थ खाऊ नये अन्यथा आरोग्याचं होईल मोठं नुकसान, जाणून घ्या

Pune Crime | अल्पवयीन वाहन चोर 24 तासात ताब्यात ! 4 लाखांचा मुद्देमाल जप्त; लोणी काळभोर पोलिसांची कारवाई

Nana Patole | पंजाबच्या घटनेमागे HM अमित शहांचा तर हात नाही ना ? पटोले यांचा गंभीर आरोप

 

Related Posts