IMPIMP

Pune Corporation | PPP तत्वावर वारजे येथे मल्टिस्पेशालिटी तर बाणेर- बालेवाडी येथे कॅन्सर हॉस्पीटल ! शासनाच्या परवानग्या व निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी स्थायी समितीची मान्यता

by nagesh
Pune Corporation | Billions of Standing Committee flights in the last phase 400 crore before the Standing Committee for tender approval

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Corporation | बांधा- वापरा व हस्तांतरीत करा तत्वावर वारजे येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल (Multispeciality Hospital Warje Malwadi) तसेच बाणेर -बालेवाडी येथे कॅन्सर हॉस्पीटल (Cancer Hospital In Baner-Balewadi) उभारण्यासाठी राज्य शासनाच्या (Maharashtra Government) विविध विभागांच्या परवानग्या घेउन निविदा (Tender) काढण्याच्या प्रस्तावांना स्थायी समितीने (PMC Standing Committee) आज मान्यता दिली. या दोन्ही हॉस्पीटलची उभारणी, यंत्रसामुग्री व मनुष्यबळासाठी १ हजार ५० कोटी रुपये खर्च येणार असून संबधित ठेकेदारांकडून काढण्यात येणार्‍या कर्जांची महापालिका (Pune Corporation) हमी घेणार आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

वारजे येथील स.नं. ७९/ब या आरक्षित जागेवर सध्या दुमजली इमारत बांधली असून सध्या ओपीडी चालविण्यात येते. याठिकाणी ३०० बेडस्चे रुग्णालय उभारण्यासाठी व ते चालविण्यासाठी ३०० कोटी रुपये खर्च आहे. संबधित विकसकानेच (Developers In Pune) ही सर्व कामे करायची असून ३० वर्षांनंतर हे हॉस्पीटल महापालिकेकडे (Pune Corporation) हस्तांतरीत करायचे आहे.

 

दुसरीकडे बाणेर- बालेवाडी येथे कॅन्सर हॉस्पीटल उभारणे व ते चालविण्यासाठी ७५० कोटी रुपये खर्च येणार आहे. या दोन्ही हॉस्पीटलसाठी महापालिका केवळ जागा उपलब्ध करून देणार आहे. या दोन्ही रुग्णालयांमध्ये महापालिकेकडून पाठविण्यात येणार्‍या काही टक्के रुग्णांवर सी.जी.एच.एस. Central Government Health Scheme (CGHS) दराने उपचार करायचे असून उर्वरीत बेड वर खाजगी दराने रुग्णांवर उपचार करायची अट घालण्यात येणार आहे.

 

हॉस्पीटल उभारणीसाठी राज्य शासनाच्या विविध विभागांची परवानगी घेणे तसेच निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी मान्यता मिळविण्याचा प्रस्ताव आज स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. तो मंजूर करण्यात आल्याचे हेमंत रासने यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कोट
महापालिकेने शहराच्या विविध भागामध्ये हॉस्पीटल उभारणीसाठी जागा आरक्षित केल्या आहेत.
परंतू मागील तीस- पस्तीस वर्षात हॉस्पीटल्सची उभारणी होउ शकली नाही. कोरोनाच्या लाटेमध्ये बेडस्ची कमतरता जाणवली.
महापालिकेचे आर्थिक उत्पन्न व रुग्णालयांची गरज विचारात घेउनच पीपीपी तत्वावर हॉस्पीटल्स उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेने यापुर्वी ज्या हॉस्पीटल्सला जागा उपलब्ध करून दिल्या आहेत, तेथे काही बेडस् आरक्षित ठेवण्यात आले आहेत.
मात्र, हॉस्पीटल्सची मालकी संबधित रुग्णालयांकडेच आहे. परंतू नवीन दोन्ही हॉस्पीटल्सची मालकी ३० वर्षांनी महापालिकेकडेच येणार आहे.
तसेच दोन्ही हॉस्पीटल्सबाबत निर्णय प्रक्रियेमध्ये महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती कार्यरत राहाणार आहे.
ज्या संस्था हॉस्पीटल्स उभारणार आहेत, ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून कर्ज काढणार आहेत. त्यांना विम्याचे कवच असेल.
त्यामुळे भविष्यात काही अडचणी आल्या तरी महापालिकेला आर्थिक तोषिस पडणार नाही.

 

– हेमंत रासने, स्थायी समिती अध्यक्ष
(PMC Standing Committee Chairman Hemant Rasne)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Corporation | Multispeciality at Warje on PPP basis and Cancer Hospital at Baner-Balewadi! Approval of PMC Standing Committee for implementation of Government Permits and Tender Process

 

हे देखील वाचा :

Instagram New Feature | ‘इन्टाग्राम’मध्ये होणार ‘हे’ 5 मोठे बदल, नव्या फीचर्समुळे बदलणार App चा चेहरामोहरा

Pune Corona Update | पुणे शहरतील कोरोनाच्या नव्या रूग्णांची संख्या कालच्या तुलनेत पुन्हा वाढली, जाणून घ्या आकडेवारी

Public Provident Fund (PPF) | पैसे जमा न केल्याने पीपीएफ खाते बंद झाले आहे का? जाणून घ्या कसे करू शकता पुन्हा सुरू

 

Related Posts