IMPIMP

Instagram New Feature | ‘इन्टाग्राम’मध्ये होणार ‘हे’ 5 मोठे बदल, नव्या फीचर्समुळे बदलणार App चा चेहरामोहरा

by nagesh
Instagram New Feature | instagram to launch 5 new features very soon know more

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Instagram New Feature | सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) असलेल्या ‘इन्टाग्राम’ची (Instagram) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. मेटाच्या मालकीचा असलेला हा प्लॅटफॉर्म या वर्षी युजर्ससाठी अनेक नवीन फिचर्स घेऊन (Social Media Platform) येत आहे. हे फीचर्स युजर्सना अधिक चांगला एक्सपिरियन्स देतील. तसेच हा प्लॅटफॉर्म अधिक युजर फ्रेंडली (User Friendly) आणि सुरक्षित देखील बनवतील. असं बोललं जातं की, इन्स्टाग्राममुळे (Instagram) कोशोरवयीन मुलींच्या मानसिक आरोग्यास (Mental Health) हानी पोहोचत आहे, असा आरोप केला जात आहे. त्यामुळे या वर्षी इन्स्टाग्रामने क्रोनोलॉजिकल फीड (Chronological Feed) किंवा आपल्या फीडमधील पोस्ट रिअरेंज (Post Rerange) करण्याच्या सुविधेसह अनेक नवीन फिचर्स आणण्याचा विचार केला आहे. जाणून घ्या इन्स्टाग्रामच्या या पाच नव्या फिचर्सबाबत. (Instagram New Feature)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

1. क्रोनोलॉजिकल ऑर्डर फीड (Chronological Order Instagram Feed)
इन्स्टाग्रामचे (Instagram) प्रमुख ॲडम मोसेरी (Adam Mosseri) यांनी सांगितले की, कंपनी युजर्ससाठी क्रोनोलॉजिकल फीड हे फीचर पुन्हा आणणार आहे. हे फीचर या वर्षाच्या सुरुवातीला युजर्सला मिळणार असल्याची घोषणा मोसेरी यांनी केली आहे. यामुळे फीडमध्ये काय दाखवायचं याची निवड युजर्स करु शकतात. यापूर्वी मोसेरी यांनी मागील महिन्यात सांगितले की, होम, फेवरेट्स (Favorites) आणि फॉलोइंग (Following) असे तीन सॉर्टिंग ऑप्शन्स (Sorting Options) युजर्स कडे असतील. होम हे सध्याचे सेटअप आहे याठिकाणी युजर्स त्यांच्या आवडीनुसार आणि वागणुकीनुसार रिलेव्हन्ट पोस्ट (Relevant Post) पाहतील. एआय (AI) नं याची अंमलबजावणी केली आहे. फेवरेट्स सेटिंगमध्ये तुम्हाला फक्त तुम्ही फेवरेट्स म्हणून मार्क केलेल्या अकाऊंटवरील पोस्टस् दिसतील. यामुळे युजर्सला अनावश्यक पोस्ट फिल्टर करण्याची सुविधा मिळणार आहे. फॉलोइंग या सेटिंगमध्ये पोस्टची क्रोनोलॉजी लावता येणार आहे. हे फीचर इन्स्टाच्या एकदम सुरुवातीच्या काळात उपलब्ध होतं. तेच फीचर पुन्हा ऐनेबल करण्याचा विचार कंपनी करत आहे.

 

2. फीडमध्ये पोस्टस् रिअरेंज (Rearrange Instagram Feed)
इन्स्टाग्रामचे आणखी एक नवीन फीचरवर काम करत असल्याचे सांगितले जात आहे. या फीचरमुळे युजर्सला प्रोफाइल ग्रिड एडिट (Profile Grid Edit) करता येणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर युजर त्यांच्या पोस्ट पाहिजे तशा रिअरेंज करु शकतील. सध्या सर्व पोस्ट तारखेनुसार अरेंज होतात. मागील महिन्यामध्ये अलेस्सांद्रो पुलुझी (Alessandro Paluzzi) या रिव्हर्स इंजिनीयरनं (Reverse Engineer) या फीचरचे दोन स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केले होते. पहिल्या स्क्रीनशॉटमध्ये ‘एडिट प्रोफाइल’ पेज दिसत असून यामध्ये एडिट ग्रिड (Edit Grid) ऑप्शन दिसत आहे. या नवीन ऑप्शनवर टॅप केल्यास एक नवीन विंडो ओपन होईल. ही विंडो युजर्सला त्यांची प्रोफाइल ग्रिड दाखवते असे दुसऱ्या स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे. (Instagram New Feature)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

3. स्टोरीसाठी मिळणार 3D अवतार (Meta Introduces 3D Avatars to Instagram Stories)
इन्स्टाग्रामची पेरेंट कंपनी मेटा सध्या मेटाव्हर्सची अंमलबजावणी करत आहे. मेटाने इन्स्टाग्रामवर देखील डिरेक्ट मेसेजेस आणि स्टोरी साठी 3D अवतार सादर करण्यास सुरुवात केली आहे. तसेच फेसबुक (Facebook) आणि मेसेंजरमध्ये (Messenger) देखील सध्याचे अवतार अपडेट करण्याचे काम सुरु आहे. हे नवीन 3D अवतार केवळ यूएस (US), कॅनडा (Canada) आणि मेक्सिकोमधील (Mexico) युजर्ससाठी लाँच केले आहे. हे अवतार स्टिकर्स, फीड पोस्ट, फेसबुक प्रोफाइल पिक्चर्स आणि मेटाच्या प्लॅटफॉर्म आणि सर्व्हिसेसवर लोकांचे ॲपियरान्स म्हणून दिसतील. यामध्ये चेहऱ्यांवरील नवीन आकार आणि इम्प्लांट, श्रवण यंत्र, व्हीलचेअर आणि दिव्यांग युजर्ससाठी सहाय्यक उपकरणे पुरवली जातील, अशी माहिती इन्स्टाग्रामने दिली आहे.

 

4. फोलोअर्ससाठी पेड सब्सक्रिप्शन (Instagram rolls out ‘Subscription-only’ feature)
इन्स्टाग्राम युजर्सला त्यांच्या आवडत्या इन्फ्युएन्सरच्या एक्सक्लुसिव्ह कंटेटसाठी (Exclusive Content) सब्सक्रिप्शन मिळवता येणार आहे. सर्वात अगोदर युनायटेड स्टेट्समध्ये (United States) लाँच होणारे हे फीचर टेस्टिंग फेजमध्ये लाँच केलं आहे. कंपनीनं गेल्या महिन्यात एका ब्लॉग पोस्टमध्ये या नवीन फिचरची घोषणा केली होती. सुरुवातीला फक्त 10 क्रिएटर्स टेस्टिंगचा भाग आहे. यामध्ये बास्केटबॉल खेळाडू, एक ऑलिम्पियन, एक ज्योतिषी आणि इतर काही लोकांचा समावेश आहे. येत्या काही दिवसात यामध्ये अधिक इन्फ्ल्युएन्सर्स जोडले जातील, अशी माहिती देण्यात आली होती.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

5. प्रोफाइल एम्बेड (Profile Embed Instagram)
या नवीन फीचरची घोषणा इन्स्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी ट्विटर पोस्टमध्ये केली.
ते म्हणाले की, एक पोस्ट आणि व्हिडिओ एम्बेड करण्याच्या क्षमतेव्यतिरिक्त युजर्स त्यांच्या प्रोफाइलचे मिनीएचर व्हर्जन्स सुद्धा एम्बेड (Profile Miniature Versions Embedded) करु शकतील. हे फीचर लोकांना तुमच्या प्रोफाइलची झलक पाहण्यासाठी परवानगी देईल. सध्या यूएसए मध्ये हे फिचर उपलब्ध आहे. हे फिचर क्रिएटर्स, ब्रँड आणि इतर व्यावसायांना त्यांचं इन्स्टाग्राम पेज थर्ड पार्टी वेबसाईटवर हायलाइट करण्यास मदत करते असेही सांगण्यात आलं आहे.

 

Web Title :- Instagram New Feature | instagram to launch 5 new features very soon know more

 

हे देखील वाचा :

Pune Corona Update | पुणे शहरतील कोरोनाच्या नव्या रूग्णांची संख्या कालच्या तुलनेत पुन्हा वाढली, जाणून घ्या आकडेवारी

Public Provident Fund (PPF) | पैसे जमा न केल्याने पीपीएफ खाते बंद झाले आहे का? जाणून घ्या कसे करू शकता पुन्हा सुरू

Public Provident Fund (PPF) | ‘ही’ बँक देतेय घरबसल्या PPF अकाऊंट उघडण्याची सुविधा; जाणून घ्या कशी करावी लागेल प्रक्रिया

 

Related Posts