IMPIMP

Pune Corona Update | पुणे शहरतील कोरोनाच्या नव्या रूग्णांची संख्या कालच्या तुलनेत पुन्हा वाढली, जाणून घ्या आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | Great relief to the people of Pune The number of active patients of Corona is within a thousand know other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona Update) रुग्णांच्या संख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. काल (मंगळवार) शहरात 964 रुग्ण आढळून आले होते. यामध्ये आज थोडी वाढ झाली आहे. आज रुग्णसंख्या वाढली असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 1 हजार 172 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 2 हजार 846 रुग्ण बरे झाले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आजपर्यंत पुणे शहरात 6 लाख 54 हजार 428 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update) आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 34 हजार 843 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 08 तर हद्दीबाहेरील 06 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 317 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज शहरामध्ये 7 हजार 373 नागरिकांची तपासणी करण्यात आली. आजपर्यंत शहरात 44 लाख 10 हजार 701 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 10 हजार 268 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
यामध्ये 214 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Invasive Ventilator) वर 40 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर (Non-invasive ventilator) 25 रुग्ण आहेत. एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपैकी 7.25 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Update | The number of new corona patients in Pune city has increased again as compared to yesterday know the statistics

 

हे देखील वाचा :

Public Provident Fund (PPF) | पैसे जमा न केल्याने पीपीएफ खाते बंद झाले आहे का? जाणून घ्या कसे करू शकता पुन्हा सुरू

Public Provident Fund (PPF) | ‘ही’ बँक देतेय घरबसल्या PPF अकाऊंट उघडण्याची सुविधा; जाणून घ्या कशी करावी लागेल प्रक्रिया

Tax Saving FD | टॅक्स सेव्हिंगची नवीन पद्धत ! 31 मार्चपर्यंत करा 5 वर्षांसाठी FD; जाणून घ्या किती मिळेल व्याज

 

Related Posts