IMPIMP

Pune Crime | जलतरण तलावात पोहताना दम लागल्याने 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, कात्रज परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | 16 year old boy drowns in Arjun Swimming Pool Jambhulwadi died pune crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | जलतरण तलावात (Swimming Pool) पोहण्यासाठी गेलेल्या एका सोळा वर्षाच्या मुलाचा पाण्यात
दम लागल्याने मृत्यू (Death) झाला. सोमेश राठोड (Somesh Rathod) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. हा प्रकार (Pune Crime) सोमवारी
(दि.2) जांभुळवाडी भागातील अर्जुन जलतरण तलावात (Arjun Swimming Pool Jambhulwadi) घडला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सोमेश राठोड (वय – 16 रा. सच्चाईमाता मंदिराजवळ, कात्रज – Katraj) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. सोमेश हा सोमवारी दुपारी अर्जुन जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना त्याला दम लागल्याने तो पाण्यात बुडाला. त्यावेळी त्याच्या जवळ पोहणाऱ्या एका मुलाच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने जलतरण तलावाच्या व्यवस्थापकाला याची माहिती दिली. यानंतर त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.(Pune Crime)

 

जलतरण तलावात पोहण्यासाठी आलेल्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी जीवरक्षक (Lifeguard) नेमणे बंधनकारक आहे. मात्र, या जलतरण तलावाच्या परिसरात जीवरक्षक नेमण्यात आले नव्हते. याबाबतची तक्रार रहिवाशांनी महापालिकेकडे (Pune Municipal Corporation (PMC) काही दिवसांपूर्वी केली होती. जलतरण तलावाच्या व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | 16 year old boy drowns in Arjun Swimming Pool Jambhulwadi died pune crime news

 

हे देखील वाचा :

Daund MNS City President | मुस्लिमांच्या भावना दुखावल्याने मनसेच्या दौंड शहराध्यक्षांचा राजीनामा

Maharashtra Police | ‘पोलिसांच्या सगळ्या सुट्ट्या रद्द’ – पोलीस महासंचालक रजनीश सेठ

MP Sanjay Raut | संजय राऊत यांची राज ठाकरेंवर नाव न घेता टीका; म्हणाले – ‘धमक्या देणाऱ्यांची एवढी ताकद नाही’

 

 

Related Posts