IMPIMP

Pune Crime | पैसे परत करण्याचा तगादा लावणार्‍या 7 जणांवर गुन्हा दाखल, पुण्यातील 4 सावकारांना अटक

by nagesh
Pune Crime News | Kondhwa: Arrested three people who beat the investigating beat marshal police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | आर्थिक विवंचनेतून त्यांनी एकाकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घेतले. अशा प्रकारे सहा जणांकडून कर्ज घेतले. या सर्वांचे कर्ज फेडण्यासाठी ७ व्याकडून १ कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने कर्ज देण्यास नकार दिल्याने मानसिक धक्का बसून एका नागरिकाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide In Pune) केली. याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शंकर लक्ष्मण गायकवाड, विजय सोनी, विजय सोनी याचे वडिल, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे, मनीष हाजरा आणि पंधरकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यापैकी विजय सोनी, बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश साळुंखे आणि मनीष हाजरा यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Crime)

 

ही घटना मंगळवार पेठेतील बालाजी हाईटस येथे सोमवारी सकाळी साडेसात वाजता घडली. गणेश शंकर शिंदे (वय ५२, रा. बालाजी हाईटस, मंगळवार पेठ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी शोभना गणेश शिंदे (वय ४७) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६५/२२) दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश शिंदे यांनी शंकर गायकवाड यांच्याकडून आर्थिक विवंचनेतून भरमसाठ व्याजाने पैसे घेतले होते.
त्यांचे पैसे फेडण्यासाठी त्यांनी एका पाठोपाठ एक अशा वेगवेगळ्या लोकांकडून व्याजाने ८४ लाख ५० हजार रुपये
घेतले. हे पैसे व व्याज परत करण्याच्या कारणावरुन आरोपी गणेश शिंदे यांना त्रास देत होते.
पंधरकर याने त्यांना १ कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेतले.
ऐनवेळी त्याने कर्ज देण्यास नकार दिला. त्यामुळे आता या सर्वांचे पैसे परत कसे करायचे,
त्यांच्या तगाद्याने अधिक वैतागून गेलेल्या गणेश शिंदे यांना याचा मानसिक धक्का बसला.
त्यांनी हे बेकायदेशीर सावकार त्यांना कसा त्रास देत होते, याबाबत त्यांनी  चिठ्ठी लिहली.
त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यात त्यांनी म्हटले.
त्यानंतर राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांच्या सुसाईड नोट वरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक अभंग तपास करीत आहेत.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | A case has been registered against 7 people who were trying to return the money, 4 moneylenders in Pune have been arrested

 

हे देखील वाचा :

HSC – SSC Exam 2023 | दहावी बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या तारखा

Pune Crime | पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारख्या ‘हुबेहुब’ दिसणाऱ्या तोतयावर गुन्हा दाखल, कुख्यात गुंड शरद मोहोळ सोबतचा फोटो केला व्हायरल

Arvind Sawant | ‘बाळासाहेबांनी वाचवलं नसतं तर…’, लालकृष्ण आडवाणी व बाळासाहेब ठाकरेंच्या बैठकीतला किस्सा सांगत शिवसेना नेत्याचा PM मोदींवर हल्लाबोल

 

Related Posts