IMPIMP

Pune Crime | पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारख्या ‘हुबेहुब’ दिसणाऱ्या तोतयावर गुन्हा दाखल, कुख्यात गुंड शरद मोहोळ सोबतचा फोटो केला व्हायरल

by nagesh
 Pune Crime | In Pune, a case has been filed against a clown who looks 'exactly' like Chief Minister Eknath Shinde, a photo of him with notorious gangster Sharad Mohol went viral.

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सारखी वेशभुषा व पोषाख परिधान करुन (Wearing Costumes) सराईत गुन्हेगार शरद मोहोळ (Sharad Mohol) याच्या सोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तोतयागिरी करणाऱ्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. विजय नंदकुमार माने Vijay Nandkumar Mane (रा. आंबेगाव) असे तोतयागिरी करणाऱ्याचे नाव असून त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bund Garden Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. (Pune Crime) अशा प्रकारचे कृत्य करणार्‍या इतरांविरूध्द देखील गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी पोलीसनामा ऑनलाइनला दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत खंडणी विरोधी पथक दोनचे (Anti Extortion Cell, Pune ) पोलीस उपनिरीक्षक मोहनदास आप्पासाहेब जाधव (PSI Mohandas Jadhav) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय नंदकुमार माने याच्यावर IPC 419-511, 469, 500, 501, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये (Information Technology Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

फिर्यादी हे बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. 19) पेट्रोलींग करत असताना माहिती मिळाली की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी वेशभुषा व पोषाख परिधान करणारा विजय माने याने सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्या सोबत फोटो काढून तो सोशल मीडियामध्ये (Social Media) व्हायरल केला आहे. तसेच समाजमाध्यमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आपण आहोत अशी तोतयागिरी करत असल्याची माहिती मिळाली.

 

त्यानुसार खंडणी विरोधी पथक दोनच्या पथकाने व्हॉट्सअॅप व फेसबुक या सोशल मीडियाद्वारे माहिती घेत असताना पोलिसांना एक फोटो मिळाला.
फोटो पाहिल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे असून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ हा खुर्चीत बसल्याचे दिसत आहे.
आरोपी विजय माने हा नियमित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी वेशभुषा व पोशाख करुन
समाजात वेगवेगळ्या कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांचा गैरसमज व्हावा अशा पद्धतीने वावरत होता.
आरोपीने जाणीव पूर्वक नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी तोतयागिरी करुन ठकवण्याचा प्रयत्न केला.
विजय माने याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समाजातील प्रतिमा मलीन करण्यासाठी सराईत गुन्हेगारासोबतचा फोटो
सोशल मीडियात व्हायरल करुन गैरसमज पसरवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),
सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajjanne),
पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव हे गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | In Pune, a case has been filed against a clown who looks ‘exactly’ like Chief Minister Eknath Shinde, a photo of him with notorious gangster Sharad Mohol went viral.

 

हे देखील वाचा :

Arvind Sawant | ‘बाळासाहेबांनी वाचवलं नसतं तर…’, लालकृष्ण आडवाणी व बाळासाहेब ठाकरेंच्या बैठकीतला किस्सा सांगत शिवसेना नेत्याचा PM मोदींवर हल्लाबोल

Pumpkin Seeds | टाकाऊ समजून डस्टबिनमध्ये टाकू नका भोपळ्याच्या बिया, अन्यथा मिळणार नाहीत फायदे

Gram Panchayat Election Results | ‘एकनाथ शिंदेंची भीती खरी ठरली’, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

 

Related Posts