IMPIMP

Pune Crime | वाढदिवसाच्या पार्टीत आलेल्या कामगाराला चोर समजून बेदम मारहाण, 6 जण ताब्यात

by nagesh
Chhatrapati Sambhajinagar Crime News | lodge owner and his son were brutally beaten up by mob for not allowing them to go to the toilet vaizapur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | वाढदिवसाची पार्टी (Birthday Party) सुरु असताना शेडच्या मागील बाजूने जाण्याचा प्रयत्न करत असताना एका कामगाराला (Worker) पाच ते सहा जणांनी बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना घडली होती. ही घटना रविवारी (दि.25) पहाटे तीनच्या सुमारास धायरी येथील लेबर कॅम्प (Labor Camp Dhairi) येथे घडली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कामगारावर सध्या पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात (Sinhagad Police Station) आयपीसी 307 सह दंगलीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात (Pune Crime) घेतले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या घटनेत गणपतसिंह केवलसिंह मेरावी (वय 38 वर्ष रा. लेबर कॅम्प, चव्हाण बाग, आमराई गार्डन, धायरी पुणे, मूळ रा. बालाघाट मध्य प्रदेश) असे गंभीर जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत गणपतसिंह याचा मित्र सुक्कलसिंह फुलसिंह मेश्राम (वय 35) याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe)
यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड परिसरातील धायरी येथील डी.एस.के. स्कूल जवळ (D.S.K. School) असणाऱ्या पत्र्याचे शेडमध्ये लेबर कॅम्प आहे.
त्याठिकाणी काही मध्य प्रदेशातील कामगार राहतात.
लेबर कॅम्पपासून पाचशे मीटर अंतरावर सनी चव्हाण (Sunny Chavan) याचा वाढदिवस करण्यासाठी तेथे त्याचे काही मित्र जमले होते.
गणपतसिंह याची मानसिक स्थिती ठीक नसल्याने तो सनी सुरेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चालू असलेल्या शेडच्या मागील बाजूने जाण्याचा प्रयत्न करत होता.
त्यावेळी आरोपींनी हा चोरी करण्याच्या हेतूने आलेला आहे असा समज करून त्याला जीवे ठार मारण्याच्या हेतूने लाथा बुक्क्याने मारहाण करुन बेशुद्ध केले.

 

दरम्यान तो निपचित पडल्याचे पाहून आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले.
याबाबत सिंहगड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमी गणपतसिंह याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
सध्या तो बेशुद्ध असून त्याच्यावर उपचार सुरू असून पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | A worker who came to a birthday party was beaten up as a thief, 6 people were detained

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘सुकांता’ची थाळी पडली दीड लाखांना; जाहिरात पाहून ऑनलाईन मागविण्याचा प्रयत्नात झाली फसवणूक

Bath Tips | 15 मिनिटापेक्षा जास्त आंघोळ करणे आरोग्यासाठी नुकसानकारक, या 5 चूका करणे टाळा

Nilesh Rane | ‘पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं, हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही’, निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

Arthritis | यूरिक अ‍ॅसिड असे करा कंट्रोल, ‘या’ 5 उपायांनी होऊ शकते सांधेदुखीपासून सुटका

 

Related Posts