IMPIMP

Pune Crime | वाहतूक पोलिसाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडणाऱ्या तरुणाला अटक

by nagesh
Pune Crime | Beating up a policeman who came to settle a dispute between husband and wife; FIR with Warje police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पावसामुळे सध्या सर्वत्र रस्त्यावर पाणी साचून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी (Traffic Jam) होते. त्यामुळे उशिरापर्यंत वाहतूक पोलिसांना (Traffic Police) वाहनांचे नियमन करावे लागते. वाहतूकीचे नियमन करणार्‍या वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करुन त्याच्या डोक्यात बिअरची बाटली मारुन जखमी करण्याचा प्रकार (Pune Crime) समोर आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी पोलीस शिपाई रमेश जाधव (Police Constable Ramesh Jadhav) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८६६/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वैभव बबन गायकवाड Vaibhav Baban Gaikwad (वय १९, रा. पवनानगर, काळेवाडी) याला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार काळेवाडी येथील एम एम चौकात रात्री सव्वा आठ वाजता घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रहाटणी फाटा येथील चौकात वाहतूक नियमन करत होते.
त्यावेळी त्यांना एम एम चौकात वाहतूक कोंडी झाली असून तेथे जाण्यास सांगितले.
त्यानुसार ते रात्री ८ वाजता तेथे जाऊन वाहतूक नियमन करु लागले.
सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास तापकीर चौकाकडून (Tapkir Chowk) येणारी वाहतूक थांबवली व चिंचवडकडून येणारी वाहने सोडली.
तेव्हा गायकवाड हा त्यांच्या जवळ आला. शिवीगाळ करु लागला. तेव्हा ते त्याला म्हणाले ट्रॅफिक जाम झाले आहे.
ते मला काढून घेऊ दे. त्यावर त्याने धक्काबुक्की करीत इकडचे ट्रॅफिक का बंद केले असे म्हणून पँटच्या आतली बाजूला खोचलेली बिअरची बाटली काढून त्यांच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
पोलिसाला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून वाहनचालक धावले. तेव्हा त्याने कोणी मध्ये सोडविण्यास आले तर त्याला सोडणार नाही,
असे जोरजोरात ओरडू धमकावु लागला. वार्डन निलेश जाधव (Warden Nilesh Jadhav) याने इतरांच्या मदतीने त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | A youth was arrested for smashing a beer bottle on the head of a traffic policeman

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | मनसेची उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जहरी टीका, एक म्हण आठवली, कपटी भावापेक्षा…

Ajit Pawar | अजित पवारांचेच आमदार संध्याकाळी आमच्याकडे येऊन बसतात, मग आम्ही त्यांना विचारतो, आमच्याकडे येण्याचे…., शिंदे गटाचे राजकारण

MP Supriya Sule | ‘भाजप जनता लॉन्ड्री’ म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना केंद्रीय राज्यमंत्र्याचे प्रत्युत्तर, म्हणाले-‘आपल्याला आठवत असेल तर…’

 

Related Posts