IMPIMP

Maharashtra Politics | मनसेची उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जहरी टीका, एक म्हण आठवली, कपटी भावापेक्षा…

by nagesh
  Sandeep Deshpande | mns leader sandeep deshpande complained against yuva sena leaders to ed and eow

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra Politics | एकीकडे राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri by-Election) शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rituja Latke) यांची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पत्रप्रपंच चालवलेला असतानाच दुसरीकडे मनसेचे इतर नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना याच पोटनिवडणुकीवरून तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टार्गेट (Maharashtra Politics) करताना दिसत आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी काल उद्धव ठाकरेंना पत्र लिहून अनेक प्रश्न विचारले होते. आता पुन्हा एकदा देशपांडे यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेला डिवचले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून भाजपला (BJP) ही निवडणूक न लढण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर काही तासातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनीही पत्रकार परिषद घेऊन ही निवडणूक (Maharashtra Politics) बिनविरोध करावी असे आवाहन सर्व पक्षांना केले. घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्देशून एक ट्विट केले आहे. देशापांडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, राजसाहेब एक म्हण आठवली कपटी भावा पेक्षा दिलदार शत्रू बरा.

 

 

शिवसेनेचे शरद पवारांना पत्र…


दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राचा मथळा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा पवार साहेबांनी दाखवला, शिवसेना (Shivsena) कुटुंबाकडून आभार, असा आहे. पत्रात म्हटले आहे की, राजकीय जीवनात अनेक वर्ष निष्ठेने पक्षाचे कार्य करणार्‍या कार्यकर्त्याचे अचानक आपल्यातून निघून जाणे, हे प्रचंड वेदना देणारे असते. यामुळे पक्षांची हानी तर होतेच. परंतु त्यांच्या कुटुंबीयांची अपरिमित हानी होते.

 

स्वर्गीय रमेश लटकेंच्या (Ramesh Latke) अचानक जाण्याने लटके आणि शिवसेना कुटुंबावर असाच दु:खाचा डोंगर कोसळला. नियमाप्रमाणे पोटनिवडणूक लागली आणि शिवसेनेने ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याचा निश्चय केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ऋतुजा लटके यांना निवडणुकीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने विरोधकांकडून झाला. मात्र, न्यायदेवतेने न्याय दिला.
वास्तविक महाराष्ट्राचे राजकारण एका उच्च संस्कृती आणि मूल्यांवर आधारलेले आहे. त्याची जपणूक शिवसेनेने सदैव केली.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde), आर. आर पाटील (R. R Patil), भाजपाच्या गिरकर ताई,
यांच्या दुर्दैवी निधनानंतर शिवसेनेने महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनुसरून संबंधित पोटनिवडणुकीत शिवसेनेचा अधिकृत उमेदवार दिला नाही.

 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले आहेत, ते कौतुकास्पद आहेत.
त्यातून शरद पवारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा दाखवला. त्यासाठी शिवसेना कुटुंब त्यांची सदैव आभारी राहील.

 

यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan), शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray),
विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh), प्रमोद महाजन (Pramod Mahajan) आणि शरद पवार
यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला अधिक उंचीवर नेण्याचे काम केले आहे.
ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे राजकारण अधिकाधिक नैतिक मूल्ये आणि संस्कृतीला जपण्याचे कार्य करेल,
अशी मला खात्री आहे, असे पत्रात म्हटले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Maharashtra Politics | mns sandeep deshpande slams shivsena uddhav thackeray over letter to ncp chief sharad pawar about andheri east bypoll

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | अजित पवारांचेच आमदार संध्याकाळी आमच्याकडे येऊन बसतात, मग आम्ही त्यांना विचारतो, आमच्याकडे येण्याचे…., शिंदे गटाचे राजकारण

MP Supriya Sule | ‘भाजप जनता लॉन्ड्री’ म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना केंद्रीय राज्यमंत्र्याचे प्रत्युत्तर, म्हणाले-‘आपल्याला आठवत असेल तर…’

Pune Fire News | डेक्कन जिमखान्यावरील चॅम्पियन स्पोर्ट्सला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक

 

Related Posts