IMPIMP

Ajit Pawar | अजित पवारांचेच आमदार संध्याकाळी आमच्याकडे येऊन बसतात, मग आम्ही त्यांना विचारतो, आमच्याकडे येण्याचे…., शिंदे गटाचे राजकारण

by nagesh
Maharashtra Governement Holidays | next year maharashtra government employees got 24 holidays but ajit pawar offset on holidays

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिंदे गटातील (Shinde Group) सर्व आमदारांची मंत्रिपदाची मागणी आहे, त्यामुळे हे सरकार टिकणे कठिण आहे,
असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले होते. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)
यांनीही अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते. जयंत पाटील आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वक्तव्याला भाजपा नेते मंत्री चंद्रकांत पाटील
(Chandrakant Patil) यांनी उत्तर दिल्यानंतर आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटले होते की, 145 चा बहुमताचा आकडा आहे, तोपर्यंत सरकार टिकणार. मंत्रिपदावरून शिंदे गटातल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे काही काळ थांबा, सर्वच समोर येईल. योग्य वेळेची वाट पाहतोय.

 

पवार आणि पाटील यांनी केलेल्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे शंभुराज देसाई यांनी म्हटले की, जे आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत, त्यातील काही आमदार संध्याकाळी कामे घेऊन आमच्याकडे येत असतात आणि तेवढे जरा मुख्यमंत्र्यांकडे विषय घ्या, अशी विनंती करतात. मग आम्हीही त्यांना सांगतो की सगळी कामे करू, पण आमच्याकडे येण्याचं काय?

 

शंभुराज देसाई यांनी पुढे म्हटले की, हे सगळे थांबवण्यासाठी आता अजित पवार हे राज्य सरकार अस्थिर असल्याचा दावा करत आहेत.

 

दरम्यान, शिवसेनेचे नेते (Shivsena), पदाधिकारी आपल्या गटात घेण्याची शिंदे गटाची धडपड
सध्या थंडावलेली दिसत असून आता राष्ट्रवादीतून इन्कमिंग करण्याचा शिंदे गटाचा मानस दिसत आहे.
दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) आणि शिंदे गटाचे कोकणातील
मंत्री उदय सामंत (Uday Samantha) यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर खळबळ उडाली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षासह नवीमुंबईतील काही पदाधिकार्‍यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे.
आता अजित पवारांच्या विधानावर पलटवार करताना देसाई यांनीही राष्ट्रवादीचे आमदार सोबत घेत असल्याचा इशारा दिला आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawars own mlas come and sit with us in the evening the shinde groups reply by shambujraj desai

 

हे देखील वाचा :

MP Supriya Sule | ‘भाजप जनता लॉन्ड्री’ म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना केंद्रीय राज्यमंत्र्याचे प्रत्युत्तर, म्हणाले-‘आपल्याला आठवत असेल तर…’

Pune Fire News | डेक्कन जिमखान्यावरील चॅम्पियन स्पोर्ट्सला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक

Pune Crime | आई, आजीने अल्पवयीन मुलीची घरीच केली प्रसृती; मांजरी, कुत्र्यांमुळे उघड्यावर टाकलेल्या अर्भकाचा जीव वाचला

Shahu Chhatrapati | कोर्टबाजीत अर्थ नाही, आता आरक्षण मिळाले नाही तर…; मराठा आरक्षणावरून शाहू छत्रपतींचं मोठं विधान

 

Related Posts