IMPIMP

MP Supriya Sule | ‘भाजप जनता लॉन्ड्री’ म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना केंद्रीय राज्यमंत्र्याचे प्रत्युत्तर, म्हणाले-‘आपल्याला आठवत असेल तर…’

by nagesh
MP Supriya Sule | bjp mp kapil patil replied to supriya sule on bhartiya janata loundry statement

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी रविवारी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना भाजप (BJP) हा आधी पक्ष होता आता भारतीय जनता लॉन्ड्री (Bharatiya Janata Laundry) झाला आहे, अशी टीका केली होती. सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या टीकेला भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (MP Kapil Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आपण मागे काय केलं, याचा विचार करुनच वक्तव्य करायला हवे, असे पाटील म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाले कपिल पाटील?

सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना कपिल पाटील म्हणाले, आपल्याला आठवत असेल तर 2019 च्या निवडणुकीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भ्रष्टाचाराचे पुस्तक छापली होती. भर सभेत त्यांनी ते पुस्तक दाखवले होते. आता दोघेही एकत्र आले आहेत. याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? खरं तर राजकारणात अशी स्थित्यांतरं येत असतात, जो-तो आपल्या सोयीप्रमाणे राजकारण करत असतो. त्यामुळे आपण मागे काय केलं, याचा विचार करुनच वक्तव्य करायला हवे.

 

सामनातून करण्यात आलेल्या टीकेलाही कपिल पाटील यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली भूमिका ही त्यांची होती. ही भाजपची भूमिका नव्हती. त्यामुळे भाजप त्यांचा कॉन्ट्रॅक्ट किलर (Contract Killer) म्हणून वापर करते, असा आरोप करणं योग्य नाही.

 

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) म्हणाल्या, आधी भारतीय जनता पक्ष होता, आता भारतीय जनता लॉन्ड्री झाली आहे. आमच्या पक्षातून त्यांच्या पक्षात गेलेले आमदार खासदार बोलतात की, भारतीय जनता पार्टीत गेल्यावर क्लिन चिट (Clean Chit) मिळते.
म्हणून ही भारतीय जनता पार्टी नसून भारतीय जनता लॉन्ड्री आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली.
भाजपने ज्या नेत्यांवर आरोप केले त्यांनाच पक्षामध्ये घेतलं आणि त्या झालेल्या इनकमिंगबाबत त्यांनी भाजपचे नामकरण केलं आहे.
भाजपमध्ये आधी वैचारिक मतभेद होते.
कधी कटूर नव्हती आता भाजपमध्ये त्यांच्या पेक्षा बाहेरचे लोक जास्त गेले आहेत.
भाजपच्या व्यासपीठावर आता मुळचे काँग्रेस (Congress) -राष्ट्रवादीचे नेते दिसतात.
त्यांच्याकडे स्वत:चे नेते कुठे दिसतात? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MP Supriya Sule | bjp mp kapil patil replied to supriya sule on bhartiya janata loundry statement

 

हे देखील वाचा :

Pune Fire News | डेक्कन जिमखान्यावरील चॅम्पियन स्पोर्ट्सला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक

Pune Crime | आई, आजीने अल्पवयीन मुलीची घरीच केली प्रसृती; मांजरी, कुत्र्यांमुळे उघड्यावर टाकलेल्या अर्भकाचा जीव वाचला

Shahu Chhatrapati | कोर्टबाजीत अर्थ नाही, आता आरक्षण मिळाले नाही तर…; मराठा आरक्षणावरून शाहू छत्रपतींचं मोठं विधान

Nana Patole | हे दळभद्री सरकार, यांच्या नाकर्तेपणामुळे शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात, नाना पटोले यांचा घणाघात

 

Related Posts