IMPIMP

Pune Crime | 5 लाख रुपयांच्या व्याजाचा हप्ता देणे चुकल्यास दररोज 15000 दंड घेणार्‍या रास्ता पेठेतील सावकारावर कारवाई

by nagesh
Pune Crime | Action taken against moneylenders in Rasta Peth who charge a fine of 15000 per day for defaulting on interest installments of Rs 5 lakh

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune Crime | गरजेपोटी घेतलेल्या ५ लाख रुपयांच्या व्याजाचा हप्ता देणे चुकल्यास दरदिवशी १५ हजार रुपये दंडाची मागणी करणार्‍या सावकारावर (Money Lender) लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

प्रसाद किसन कुतळ Prasad Kisan Kutal (वय ४५, रा. जेधे पार्क, रास्ता पेठ) असे गुन्हा दाखल केलेल्या सावकाराचे नाव आहे.

 

याप्रकरणी एका दुग्ध व्यवसायिकाने लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४३/२२) दिली आहे. हा प्रकार २५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु होता. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी गरजेपोटी प्रसाद कुतळ यांच्याकडे ५ लाख रुपये मागितले.
त्याने फिर्यादी यांना बँकेत बोलावून प्रथम दोन महिन्याचे व्याजाची रक्कम १ लाख रुपये रोख स्वरुपात घेतली.
त्यानंतर त्यांच्या खात्यावर ५ लाख रुपये ट्रान्सफर केली.
फिर्यादी यांनी त्यांना ऑनलाईन तसेच रोख स्वरुपात एकूण ५ लाख ९५ हजार रुपये दिले.
तरीही फिर्यादीकडून व्याजाचा हप्ता देणे चुकल्याने आरोपींने प्रत्येक दिवसाला १५ हजार रुपये दंड असे
एकूण १८ लाख १० हजार रुपयांची फिर्यादीकडे मागणी केली.
त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक बनसुडे (Sub-Inspector of Police Bansude) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Action taken against moneylenders in Rasta Peth who charge a fine of 15000 per day for defaulting on interest installments of Rs 5 lakh

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | संजय राऊत मातोश्रीवर नंतर जाणार सर्वप्रथम शरद पवारांच्या भेटीला

Nitesh Rane | नाद नाही करायचा ! अफजल खानाच्या थडग्याजवळील अनधिकृत बांधकाम हटवले – नितेश राणे

Shivsena MP Sanjay Raut | ‘मी माझा एकांत सत्कारनी लावला’, राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

 

Related Posts