IMPIMP

Nitesh Rane | नाद नाही करायचा ! अफजल खानाच्या थडग्याजवळील अनधिकृत बांधकाम हटवले – नितेश राणे

by nagesh
MLA Nitesh Rane | file a case against nitesh rane for violation of code of conduct shiv sena demand

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन राज्यभरात आज (दि. 10 नोव्हेंबर) ‘शिवप्रताप दिन’ साजरा होत आहे. त्यानिमित्ताने राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने आज भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी भाष्य केले आहे. राज्यातील हिंदुत्ववादी सरकारने आज शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने जी शिवप्रेमींची मागणी होती, ती पूर्ण केली आहे. शिवप्रमींनी शिंदे सरकारने आनंदाचा क्षण दिला आहे, असे नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

प्रतापगडाच्या पायथ्याशी मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Maratha King Chatrapati Shivaji Maharaj) यांनी अदिलशाहीचा सेवक अफजल खान (Afzal Khan) याचा वध केला होता. त्याची कबर (समाधी) प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याकाळी बांधण्यात आली होती. पण त्या कबरीच्या भोवती अतिक्रमण करण्यात आले होते. ते अतिक्रमण हटविण्यासाठी गेली अनेक वर्षे शिवप्रेमी मागणी करत होते. ती मागणी शिंदे यांच्या सरकारने पूर्ण केल्याचे नितेश राणे (Nitesh Rane) यावेळी म्हणाले. तसेच उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील हे अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते. तरी देखील कोणतेही सरकार त्यावर कारवाई करत नव्हते. पण आज महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी विचारांच्या सरकारने हा निर्णय देऊन सर्व शिवप्रमेंसाठी ऐतिहासिक क्षण दिला आहे. ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devednra Fadnavis) यांचे आभार मानतो, असे नितेश राणे म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आजच्या दिवशाची 1959 साली शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट झाली.
यावेळी शिवाजी महाराजांना अलिंगन देताना अफजल खानाने शिवाजी महाराजांना हाताच्या कैचीत आवळून ठार
मारण्याचा प्रयत्न केला. पण शिवाजी महाराजांनी चिलखत घातले होते. आणि त्यांच्या हातात वाघनखे होती.
त्यांनी ती अफजल खानाच्या पोटात घूसवून त्याला ठार मारला. त्याच्या मृत्युनंतर त्याला इस्लाम धर्माप्रमाणे
मूठमाती देऊन त्याची समाधी प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधण्याचे आदेश दिले होते.
तसेच त्या समाधीवर दिवा बत्तीची सोय सुद्धा शिवाजी महाराजांनी लावून दिली होती.

 

 

Web Title :-  Nitesh Rane | bjp nitesh rane on illegal construction removed from pratapgarh in satara

 

हे देखील वाचा :

Satara Crime | सातार्‍यात उदयनराजेंच्या कार्यकत्यावर गोळीबार

Gold Rate Today | तुळशी विवाहानंतर सोन्या-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Pune Crime | कट मारल्याच्या कारणावरुन तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न; मुंढव्यातील बंधारा रोडवरील घटना

Pune Crime | किरकोळ कारणावरून खुनाचा प्रयत्न, लोहगाव परिसरातील घटना

 

Related Posts