IMPIMP

Pune Crime | 50 हजारांची नुकसान भरपाई न दिल्याने जीवे मारण्याचा प्रयत्न; बंडगार्डन पोलिसांनी केली दोघांना अटक

by nagesh
une Crime News | The four who kidnapped and abducted the contractor were chased and imprisoned

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पाठीमागून येऊन पुढच्या कारला स्वत: धडक दिली असताना ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई मागितली. ती न दिल्याने दोघांनी एका कारचालकाला लोखंडी रॉडने मारहाण करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या गळ्यातील ५ तोळयांची सोन्याची साखळी जबरदस्तीने काढून (Pune Crime) घेतली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी (Bundgardan Police Station) दोघांना अटक (Arrest) केली आहे.

नौशाद अब्दुल रशीद शेख (वय ३०) आणि मन्सूर अब्दुल रशीद शेख (वय ३४, दोघे रा. ताडीवाला रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विकास प्रकाश अगरवाल (वय ३८, रा. रास्ता पेठ) हे या घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा रोडवरील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. बंडगार्डन पोलिसांनी त्यांची रुग्णालयात जाऊन फिर्याद (गु. र. नं. २४३/२१) घेतली आहे. हा प्रकार तारापोर रोडवरील इस्कॉन मंदिराच्या समोर बुधवारी दुपारी चार वाजता घडला (Pune Crime) होता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकास अगरवाल हे आपल्या कारने जात असताना पाठीमागून आलेल्या शेख यांच्या गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली. त्यांची चूक असतानाही शेख यांनी फिर्यादी यांच्याकडे ५० हजार रुपये नुकसान भरपाई मागितली. फिर्यादी यांनी आम्ही नुकसान भरपाई देणार नाही, असे सांगितल्यावर त्याने मन्सूर शेख याला बोलावले. त्यांनी फिर्यादी यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील ५ तोळे वजनाची सोन्याची चेन काढून घेतली. बंडगार्डन पोलिसांनी खूनाचा प्रयत्न (Attempt to murder) केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक कोळी तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Attempt to kill for non-payment of Rs 50,000; Bundgarden police arrested the two

 

हे देखील वाचा :

Mumbai Hyderabad Bullet Train | मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध

Pune News | पुण्यामधील पाटील इस्टेट येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पुढील 4 वर्षांमध्ये पुर्ण करणार; सोमवारपासून सर्वेक्षण सुरु होणार

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले ब्रीजवर सलग तिसऱ्या दिवशी अपघात ! ट्रकने 8 वाहनांना धडक दिल्याने दोन महिला जखमी

 

Related Posts