IMPIMP

Pune Crime | मोटारीला वाट न दिल्याने टेम्पोचालकास बेदम मारहाण करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर

by nagesh
Pune Crime | Bail granted to the accused who suffocated the tempo driver for not waiting for the car

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | मोटारीस वाट न दिल्याच्या रागातून टेम्पो चालकाला वायपर व लोखंडी रॉडने बेदम मारहाण (Beating) करुन गंभीर जखमी केल्याची घटना पुण्यातील कात्रज (Pune Crime) येथे 26 डिसेंबर 2022 रोजी घडली होती. याप्रकरणी आरोपी संदीप नरसिंग चव्हाण (रा. धायरी) याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपी चव्हाण याला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने (Pune District and Sessions Court) जामीन मंजूर (Bail Granted) केला असल्याची माहिती अ‍ॅड. सुधीर पाटील (Adv. Sudhir Patil) यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत टेम्पोचालक आदिनाथ जाधव (रा. कोंढवा) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidhyapeeth Police Station) फिर्याद दिली होती. टेम्पोचालक जाधव हे कात्रज चौकातील सिग्नलला थांबले होते त्यावेळी पाठीमागून आलेल्या मोटारीला वाट न दिल्याने मोटारचालक चव्हाणने टेम्पोचालक जाधव यांना शिवीगाळ केली. त्यानंतर चव्हाणने मोटारीत ठेवलेल्या लोखंडी रॉडने आणि टेम्पोचा वायपर तोडून जाधव यांना वायपरने बेदम मारहाण केली. आरोपी संदीप चव्हाण याने केलेल्या मारहाणीत (Pune Crime) टेम्पोचालक आदिनाथ जाधव यांच्या डोक्याला व डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. जाधव यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेवून आरोपी संदीप चव्हाण याचेविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक (Arrest) केली होती. (Pune Crime News)

 

आरोपी संदीप चव्हाण याने पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात अ‍ॅड. सुधीर पाटील यांचेमार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. अ‍ॅड. सुधीर पाटील यांनी आरोपी संदीप चव्हाण याची बाजू न्यायालयात मांडली व न्यायालयापुढे युक्तिवाद केला कि, आरोपीच्या मारहाणीत फिर्यादीस झालेल्या जखमा ह्या साध्या असून तसे वैद्यकीय अहवालात (Medical Report) नमूद आहे. त्याचप्रमाणे पोलिस रिपोर्ट मध्ये वायपर जप्त केल्याचे कुठेही नमूद नाही. आरोपी व फिर्यादी यांच्यामध्ये कुठलेही वैमनस्य नव्हते व त्याला मारण्याचा कुठलाही हेतू आरोपींकडे नव्हता हे विविध उच्च न्यायालयाचे (High Court) न्यायनिवाडे सादर करून अ‍ॅड. सुधीर पाटील यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

 

सरकारी वकिलांनी आरोपीच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध करत कोर्टापुढे युक्तिवाद केला की,
आरोपीने किरकोळ कारणावरून फिर्यादीस बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आहे
सदर प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झाला नसून आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. वाघमारे (Judge A. S. Waghmare) यांनी दोन्ही
बाजूचा युक्तिवाद ऐकून अ‍ॅड. सुधीर पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी संदीप चव्हाण याची
जामिनावर मुक्तता केली. या प्रकरणात अ‍ॅड. सुधीर पाटील यांना अ‍ॅड. कार्तिक दारकुंडे
(Adv. Karthik Darkunde), अ‍ॅड. विशाल वीर-पाटील (Adv. Vishal Veer-Patil) व अ‍ॅड. अर्जुन वाघमारे
(Adv. Arjun Waghmare) यांनी सहकार्य केले.

 

Web Title :- Pune Crime | Bail granted to the accused who suffocated the tempo driver for not waiting for the car

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | कात्रज परिसरात लोखंडी प्लेटा चोरणार्‍यांचा पर्दाफाश; भारती विद्यापीठ पोलिसांकडून दोघांना अटक

Chitra Wagh | औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्यावरून चित्रा वाघ यांच्या ‘त्या’ वक्तव्याने पुन्हा एकदा नामांतरणाचा वाद पेटण्याची चिन्हे

Pune Crime | गुन्हे शाखेकडून 16 लाखांचे चरस जप्त, परराज्यातील दोघांना अटक

 

Related Posts