IMPIMP

Pune Crime | प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक किशोर पाटे, संकेत पाटे, रोहन पाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यातील प्रसिद्ध अमित वास्तू व्हेंचर्सचे (Amit Vastu Ventures Llp) भागीदार (Partner) असलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक (Builders In Pune) किशोर गोविंद पाटे (Kishor Govind Pate), संकेत किशोर पाटे (Sanket Kishor Pate), रोहन किशोर पाटे (Rohan Kishor Pate) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा (Cheating Case) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्यासह पंकज छल्लानी (Pankaj Chhallani) आणि भागचंद छल्लानी (Bhagchand Chhallani) यांच्याविरुद्ध देखील गुन्हा (Fraud Case) दाखल करण्यात आलेला आहे.
अशोका बिल्डकॉनचे (Ashoka Buildcon ltd) संचालक आशिष अशोक कटारिया (Ashish Ashok Kataria) यांच्या फसवणुकीप्रकरणी हा गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर (Senior Police Inspector Krishna Indalkar) यांनी दिलेल्या माहितीनुसार,
अमित वास्तू व्हेंचर्स या बांधकाम कंपनीने सहकारनगर (Sahakar Nagar) येथे मोंन्टेसिटी नावाची साईट (Montecito) बांधली आहे.
या साईटमधील 701, 702, 1001, 1002 हे चार फ्लॅट ऑगस्ट 2018 मध्ये पंकज छल्लानी आणि भागचंद छल्लानी यांनी विकत घेतले होते.
मात्र, त्यांना पैशांची आवश्यकता असल्याने छल्लानी यांनी हे फ्लॅट त्यांचे नातेवाईक असलेल्या आशिष अशोक कटारिया यांना विकण्याचा निर्णय घेतला. (Pune Crime)

 

त्यानुसार, छल्लानी आणि कटारिया यांच्यामध्ये एकूण 14 कोटी रुपयांचा व्यवहार ठरला.
त्यातील 2 कोटी रुपये कटारिया यांनी छल्लानी यांना दिले. तसेच बँक लोन केले.
याचे आजवर 2 कोटी 26 लाख रुपयांचा बँकेचा हप्ता भरला.
छल्लानी आणि कटारिया यांच्यामध्ये व्यवहार होण्यापूर्वी पाटे आणि छल्लानी यांच्यातील खरेदीचा व्यवहार रद्द करण्यात आला.
आरोपींनी संगनमत करून 500 रूपयांच्या स्टॅम्प वर नमूद करण्यात आलेल्या 17 सप्टेंबर 2018 या तारखेमध्ये खाडाखोड करून 7 सप्टेंबर 2018 अशी तारीख केली.
त्याद्वारे छल्लानी आणि पाटे यांच्यातील व्यवहार रद्द करून या चार फ्लॅटची मालकी पाटे यांच्याकडे असल्याचे भासविले.
छल्लानी आणि कटारिया हे दोघेही नातेवाईक आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलीस निरीक्षक इंदलकर यांच्या माहितीनुसार, पाटे यांनी 2020 साली याच प्रकरणात कटारिया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा (Crimes Branch) करीत आहे.
तर, त्यांच्यामध्ये आणखी एक सिव्हिल मॅटर सुरू आहे. पोलीस आता आरोपींनी स्टॅम्प कधी खरेदी केला हे तपासणार आहेत.
न्यायालयाने 156 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिल्याने दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police) हा गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Case filed against famous builders Kishor Pate Sanket Pate Rohan Pate

 

हे देखील वाचा :

Raosaheb Danve | ‘मला महाराष्ट्राचा ‘ब्राह्मण’ मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा आहे’ – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

Interest on PF : साडे 6 कोटी लोकांसाठी खुशखबर ! पुढील महिन्यात मिळू शकतात ‘हे’ पैसे

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिकेतील उपायुक्त अजित देशमुख यांची मिळकत कर विभागप्रमुखपदी तर आशा राउत यांची घन कचरा व्यवस्थापन विभागप्रमुखपदी नियुक्ती

 

Related Posts