IMPIMP

Raosaheb Danve | ‘मला महाराष्ट्राचा ‘ब्राह्मण’ मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा आहे’ – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

अजित पवार म्हणाले 'तृतीयपंथीही...'

by nagesh
Raosaheb Danve | I want to see brahmin as maharashtra chief minister says union minister Raosaheb Danve

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइनकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी काल औरंगाबाद (Aurangabad) येथे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री (Maharashtra CM) ब्राह्मण (Brahmin) बघण्याची इच्छा आहे, असे म्हटले आहे. रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या या वक्तव्यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील दानवे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री कोणीही होऊ शकतं. तृतीयपंथी व्यक्ती देखील मुख्यमंत्री होऊ शकतो, असे अजित पवार म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अजित पवार म्हणाले, कोणत्याही जातीतला किंवा तृतीयपंथीयांनासुद्धा 145 सदस्यांचा पाठिंबा मिळाला तर ते सत्ता स्थापन करु शकतात किंवा मुख्यमंत्री होऊ शकतात. दानवे यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना ते बोलत होते. परशुराम जयंतीनिमित्त (Parashuram Jayanti) आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी हे वक्तव्य केलं होतं. ब्राह्मण समाजाच्या एका व्यक्तीने दानवे यांच्या भाषणाच्या वेळी प्रशासकीय आणि सरकारी सेवेमध्ये ब्राह्मणाचा समावेश जास्त असावा अशी मागणी केली होती.

 

काय म्हणाले दानवे?

रॅलीत करण्यात आलेल्या मागणीला उत्तर देताना दानवे म्हणाले, मी ब्राह्मण समाजाला फक्त नगरसेवक (Corporator) किंवा
सरकारी नोकरीमध्ये (Government Job) नाही तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छितो.
मी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या निवडणुकांचा प्रचार करण्यासाठी गेलो असताना जातीयवाद खूप वाढल्याचं मला दिसलं.
समाजाला एकत्र ठेवण्यासाठी एका नेत्याची गरज आहे असेही ते म्हणाले.

 

Web Title :- Raosaheb Danve | I want to see brahmin as maharashtra chief minister says union minister Raosaheb Danve

 

हे देखील वाचा :

Interest on PF : साडे 6 कोटी लोकांसाठी खुशखबर ! पुढील महिन्यात मिळू शकतात ‘हे’ पैसे

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिकेतील उपायुक्त अजित देशमुख यांची मिळकत कर विभागप्रमुखपदी तर आशा राउत यांची घन कचरा व्यवस्थापन विभागप्रमुखपदी नियुक्ती

Pune Crime | 25 लाखाची खंडणी मागणाऱ्या विक्रांत शिवणकर याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

 

Related Posts