IMPIMP

Pune Crime | सामाईक जागेच्या वादातून तिघांना कुऱ्हाडीने मारहाण, लोणी काळभोर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एकाला अटक

by nagesh
Chhatrapati Sambhajinagar Crime News | lodge owner and his son were brutally beaten up by mob for not allowing them to go to the toilet vaizapur

पुणे / लोणी काळभोर :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | सामाईक जागेच्या (Common Space) वादातून (Disputes) तिघांना कुऱ्हाडीने आणि कुऱ्हाडीचा दांडक्याने मारुन परिसरात दहशत निर्माण केल्याचा प्रकार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीत घडला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करुन एकाला अटक (Arrest) करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास लोणी काळभोर (Pune Crime) येथील अंबरनाथ मंदिराशेजारी घडली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत राणी संदीप काळभोर Rani Sandeep Kalbhor (वय-37 रा. प्रथमेश क्रिस्टल, संभाजीनगर, कदमवाक वस्ती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सूर्यकांत सुभाष काळभोर Suryakant Subhash Kalbhor (वय-43) आणि सुभाष कृष्णाजी काळभोर Subhash Krishnaji Kalbhor (दोघे रा. कदमवाक वस्ती, ता. हवेली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन सुर्यकांत काळभोर याला अटक केली आहे. (Pune Crime)

 

पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे (PSI Bhagwat Shendge) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे नातेवाईक (Relatives) आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी फिर्यादी यांचा चुलत दिर आहे तर गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी चुलत सासरे आहेत. त्यांच्यामध्ये समाईक जागा असून या जागेचा वाद न्यायालयात (Court) सुरु आहे. मंगळवारी दुपारी फिर्यादी हे सामाईक जागेत साफसफाई करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी सुर्यकांत काळभोर याने सामाईक जागेत कशाला आले आहात असे म्हणत फिर्यादी यांचे सासरे शहाजी काळभोर यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली. तसेच शहाजी यांच्या डोक्यात कुऱ्हाड (Ax) मारुन जखमी केले. चुलत सासरे हरिश्चंद्र काळभोर (वय-62) हे भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांना देखील कुऱ्हाडीने मारुन जखमी केले. तर फिर्यादी यांना कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

भांडण सुरु असताना फिर्यादी यांच्या जाऊ भारती काळभोर याच्या हातावर आरोपी सुभाष काळभोर याने फरशी मारुन जखमी केले.
तसेच सुर्यकांत याने सासु यमुनाबाई यांच्या हाताच चावा घेऊन शिवीगाळ केली.
आरोपी सुर्यकांत याने फिर्यादी व त्यांच्या इतर नातेवाकांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हातात कुऱ्हाड घेऊन
अंगावर धाऊन जात परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | common land dispute, one arrested by loni kalbhor police station

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | पाटणकरांवरच्या कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांंसोबत काय बोलणं झालं?, संजय राऊत म्हणाले….

Ashish Shelar | गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून शेलारांची मागणी मान्य, सभागृहात केली मोठी घोषणा (व्हिडीओ)

Bachchhan Paandey Box Office Collection | ‘The Kashmir Files’ बनली ‘बच्चन पांडे’ या चित्रपटासाठी ग्रहण… प्रदर्शनाच्या 5व्या दिवशी सुद्धा कमाईमध्ये कमतरता

 

Related Posts