IMPIMP

Pune Minor Girl Rape Case | पुण्यात माजी सरपंचाचं घृणास्पद कृत्य, अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार

by nagesh
Pune Crime | former sarpanch of pune heinous act 17 year old minor girl raped in a lodge

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Minor Girl Rape Case | पुणे शहरामध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना
पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील एका माजी सरपंचाने एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Pune Minor Girl Rape Case)
केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संतोष नाझिरकर (वय-40 रा. पुरंदर
तालुका) असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

संतोष नाझिरकर याने पीडित मुलीला लॉजवर (Pune Minor Girl Rape Case) घेऊन गेला. या तरुणीने आपल्यावर होणाऱ्या घटनांची पूर्व कल्पना आपल्या आईला दिली आणि लोकेशन पाठवलं. आईने सतर्क होऊन तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना हा प्रकार सांगितला. पोलिसांनी तात्काळ मुलीने पाठवलेल्या लोकेशनवर जाऊन आरोपीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष नाझिरकर आणि पीडित मुलीची व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून
ओळख झाली होती. चॅटिंग करत दोघांमध्ये चांगली ओळख झाली.
त्यानंतर आरोपीने बुधवारी बाहेर जेवायला जाऊ असं सांगत पीडित मुलीला कात्रज येथील एका लॉजवर नेले
आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने घटना घडण्यापूर्वी बाथरुममध्ये जाऊन आईला फोन करुन लोकेशन पाठवले. आईने तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला त्यावेळी संतोष नाझीरकर याला बलात्कार करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Crime | former sarpanch of pune heinous act 17 year old minor girl raped in a lodge

हे देखील वाचा :

How To Lose Weight | ‘ही’ आहे ती 1 गोष्ट जी कमी करते वजन, वितळेल पोटाची चरबी, आत जाईल पोट, केवळ अशी करा सेवन

Uddhav Thackeray Group | ‘मातोश्री’चं किचन सांभाळते म्हणणार्‍या बाईला वैतागले म्हणत महिला नेत्याचा ठाकरेंना रामराम

Sakal Che Upay | सकाळी उठताच करा ‘हे’ 7 उपाय, मार्गी लागतील सर्व बिघडलेली कामे

Related Posts