IMPIMP

Pune Crime | ‘सुकांता’ची फ्री थाळी पडली 1 लाखाला; जाहिरात पाहून ऑनलाइन मागविताना झाली फसवणूक

by nagesh
Pune Cyber Crime | 27 lakhs was charged to an IT youth for a loan of 40 lakhs

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | फेसबुकवर (Facebook) ‘सुकांता’ थाळीची जाहिरात (Sukanta Thali Advertisement) पाहून ऑनलाइन ऑर्डर (Online Order) करण्याचा प्रयत्न एका महिलेच्या चांगलाच अंगलट आला. सायबर चोरट्यांनी (Cyber Crime) त्यांच्या पतीच्या खात्यातून 1 लाख 1 हजार 722 रुपये काढून घेऊन फसवणूक (Fraud Case) केली. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी टिंगरेनगर येथील 46 वर्षांच्या फिर्यादीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार 20 ऑगस्ट रोजी घडला. फिर्यादी यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) तक्रार अर्ज केला होता. तक्रार अर्जाचा तपास करून पोलिसांनी बुधवारी (दि.7) अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसी 419, 420 सह आयटी अॅक्ट (IT Act) अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

फिर्यादी यांच्या पत्नीने फेसबुकवर ‘सुकांता थाळी’ची 250 रुपयांवर एक थाळी फ्री अशी जाहिरात पाहून त्यावरील मोबाइलवर संपर्क साधला. तेव्हा सायबर चोरट्याने त्यांना ऑफरची लिंक पाठवली. आरोपींनी फिर्यादी यांच्या पत्नीला फोन करून लिंक क्लिक करण्यास सांगितले. लिंक क्लिक करून त्यामध्ये क्रेडिट कार्डची (Credit Card) माहिती भरण्यास सांगितले.

 

त्यानुसार त्यांनी कार्डची माहिती भरल्यावर त्यांच्या मोबाइलचा अ‍ॅक्सेस सायबर चोरट्याने घेऊन
त्यांच्या पतीच्या एचडीएफसी बँक खात्यातून 1 लाख 1 हजार 722 रुपये काढून घेऊन त्यांची फसवणूक (Cheating Case) केली.
त्याबाबत त्यांनी तक्रार केली होती.
त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक शिंदे (Police Inspector Shinde) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Free thali of ‘Sukanta’ for 1 lakh;I got cheated while ordering online after seeing the advt

 

हे देखील वाचा :

Amravati ACB Trap | तीस हजारांची लाच घेताना सरपंचासह पती लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात; चांदुर तालुक्यातील घटना

Gujarat Elections Result | ‘महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही या विजयात फळले असावेत’; गुजरात निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या भाजपला शुभेच्छा

Pune Crime | प्रेमसंबंध तोडल्याने प्रेयसीचे विवस्त्रावस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल; पुण्यातील धक्कादायक प्रकार

 

Related Posts