IMPIMP

Amravati ACB Trap | तीस हजारांची लाच घेताना सरपंचासह पती लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात; चांदुर तालुक्यातील घटना

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाईन- चांदुर तालुक्यातील शिरजगाव बंड येथे विविध कामे केलेल्या बिलांचे पैसे मिळण्यासाठी खुद्द सरपंचांनी लाच
मागितल्याचा (Amravati ACB Trap) प्रकार घडला आहे. या प्रकरणी लाचलुचपत विभागाला (Amravati ACB Trap) तक्रार मिळताच विभागाने
सापळा कारवाई करत आरोपी सरपंच आणि त्यांच्या पतीला जेरबंद केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांनी 18 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत शिरजगाव बंड येथील सरपंच आणि त्यांचे पती यांच्याजवळ ग्रामपंचायतीच्या केलेल्या विविध कामांच्या बिलांचे पैसे मागितले. परंतु, सरपंच शिल्पा धीरज इंगळे (वय 39) आणि त्यांचे पती धीरज रामरावजी इंगळे (वय 43) यांनी कामाचे बिल मंजूर करण्यासाठी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याची तक्रार लाचलुचपत विभागाला (Amravati ACB Trap) देण्यात आली. त्यानुसार 20 नोव्हेंबर आणि 07 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईत पंचासमक्ष सरपंच शिल्पा इंगळे व त्यांचे पती धीरज इंगळे यांनी तक्रारदार यांना बिल मंजूर करण्यासाठी 30 हजार रुपये लाचेची मागणी करून ते स्वीकारण्याची तयारी दर्शवली.

 

त्यानुसार गुरुवारी (दि. 8 डिसेंबर) करण्यात आलेल्या सापळा कारवाईत अंकुश ढाबा, शिरजगाव बंड, चांदुर बाजार ते अचलपूर रोड येथे पंचासमक्ष सरपंच शिल्पा इंगळे आणि त्यांचे पती धीरज इंगळे यांनी तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक केली. दोन्ही आरोपींच्या विरोधात चांदुर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत,
अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक संजय महाजन, पोलीस उपअधीक्षक शिवलाल भगत,
पोलीस निरीक्षक केतन मांजरे, पोलीस निरीक्षक अमोल कडू, पोलीस नाईक युवराज राठोड, शैलेश कडू,
पोलीस हवालदार स्वाती सरोदे, पोलीस उपनिरीक्षक बारबुद्धे यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Amravati ACB Trap | Sarpanch along with husband in the net of bribery department while taking bribe of thirty thousand; Incidents in Chandur Taluka

 

हे देखील वाचा :

Gujarat Elections Result | ‘महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही या विजयात फळले असावेत’; गुजरात निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या भाजपला शुभेच्छा

Pune Crime | प्रेमसंबंध तोडल्याने प्रेयसीचे विवस्त्रावस्थेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Crime | दत्तजयंतीत धक्का लागल्याने टोळक्याचा राडा, 7 जणांवर FIR; कोथरूड परिसरातील घटना

 

Related Posts