IMPIMP

Pune Crime News | हडपसर पोलिसांकडून वाहन चोरीचे 14 गुन्हे उघडकीस, 10 लाखाचा मुद्देमाल जप्त

by nagesh
 Pune Crime News | 14 cases of vehicle theft solved by hadapsar police accused arrested and goods worth rs 10 lakh seized

पुणे :सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) शहर आणि परिसरातुन वाहन चोरी करणार्‍या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे तब्बल 14 गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून पोलिसांनी 10 लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune Crime News)

 

परशुराम उर्फ परश्या शिवाजी मोरे (24, सध्या रा. मु.पो. कोळवीरे, ता. पुरंदर, जि. पुणे. मुळ रा. मु.पो. कलहिरप्परगा, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून 3 होंडा युनिकॉर्न, 2 अ‍ॅक्टीव्हा, 2 हिरोहोंडा पॅशन, 1 ज्युपिटर, 1 हिरो स्पलेंन्डर, 1 बजाज प्लॅटिना, 1 हिरो होंडा डिलक्स, 1 बुलेट अशा एकुण 14 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून हडपसर पोलिस ठाण्यात दाखल असलेले 7, भोसरी -2, लोणीकंद, विश्रामबाग, बारामती, विजापूर, इंडी आणि कर्नाटक पोलिस ठाण्यात प्रत्येक 1 असे एकुण 14 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर आयुक्त रंजनकुमार शर्मा,
पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहाय्यक आयुक्त बजरंग देसाई
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे, विश्वास डगळे यांच्या सुचनेप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक निरीक्षक विजयकुमार शिंदे,
उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलिस अंमलदार संदीप राठोड, समिर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत धुमाळ,
प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अजित मदने, रशिद शेख, मनोज सुरवसे,
अमोल दणके, कुंडलीक केसकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :- Pune Crime News | 14 cases of vehicle theft solved by hadapsar police accused arrested and goods worth rs 10 lakh seized

 

हे देखील वाचा :

Roshani Shinde Case | ‘रोशनी शिंदे मारहाण फक्त स्टंटबाजी’, शिंदे गटाच्या महिला खासदाराने घेतली अमित शाह यांची भेट

Pune News | कै. पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ दि. ८ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रम – मोहन जोशी

Maharashtra Politics News | ‘हेच फडणवीस तेव्हा ‘फूल’ होते, आता ‘फडतूस’ झाले’, मनसे नेत्याचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Maharashtra Politics News | ‘सुषमा अंधारे, राखी सावंत दोघी बहिणी’, भाजप नेत्याची खोचक टीका, म्हणाले-‘दोघींमध्ये…’

 

Related Posts