IMPIMP

Pune News | कै. पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ दि. ८ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रम – मोहन जोशी

by nagesh
pune news | Birth centenary year of Pt. Kumar Gandharva started. Special Program on 8th April - Mohan Joshi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune News | ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार अशा सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण करणारे पद्मविभूषण कै. पं. कुमार गंधर्व यांचे जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ दिनानिमित्त शनिवार, ८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परीषद, टिळक मार्ग, पुणे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रीय गायक सर्वश्री पं. डॉ. मोहनकुमार दरेकर, पं. राजेंद्र कंदलगांवकर व श्रीमती मीनाताई फातर्पेकर सहभागी होत आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हासदादा पवार भूषवणार आहेत अशी माहिती आयोजक पुणे कला क्रीडा केंद्राचे अध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी दिली. (Pune News)

 

कै. पं. कुमार गंधर्व यांचे प्रतिमेचे पूजन केल्यानंतर दीपप्रज्वलन व तन्मयी मेहेंदळे यांनी सादर केलेली प्रार्थना झाल्यानंतर तीनही पाहुणे कै. पं. कुमार गंधर्व यांच्याबद्दलच्या आठवणी व त्यांच्या गायिकीची वैशिष्टे विशद करतील. सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला आहे असे आयोजक मोहन जोशी यांनी सांगितले. (Pune News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- pune news | Birth centenary year of Pt. Kumar Gandharva started. Special Program on 8th April – Mohan Joshi

 

हे देखील वाचा :

Akka Mahadevi | क्रांतिवीरांगना वैराग्ययोगिनी अक्कमहादेवी

Maharashtra Politics News | ‘हेच फडणवीस तेव्हा ‘फूल’ होते, आता ‘फडतूस’ झाले’, मनसे नेत्याचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

Pune Crime News | पुणे रेल्वे स्टेशनवर पोलिसांकडूनच ‘लुटमार’ ! 5 लाखाचे तोडपाणी? 6 पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत, पण…

Nikita Takle-Khadsare | लोणावळाच्या ऑटो क्रॉस मध्ये फास्टर ड्रायव्हरसह 9 ट्रॉफी पटकविल्या; निकिता टकले खडसरेचे यश

 

Related Posts