IMPIMP

Pune Crime News | 15 वर्षाच्या मुलावर ब्लेडने वार; वडगाव शेरीमधील घटना

by nagesh
Pune Crime News | Loni Kalbhor Police Station - I'm Tipu Pathan's gang member ! A young man was stabbed

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | जुन्या भांडणाच्या कारणावरुन शाळकरी मुलांनी एका १५ वर्षाचा मुलगा व त्याचा मित्र अशा दोघांवर ब्लेडने वार करुन त्यांना जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी चंदननगरमधील बोराटे वस्तीत राहणार्‍या एका पालकाने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मदर टेरेसा शाळेत शिकणारा मुलगा व त्यांचे मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वडगाव शेरीमधील (Wadgaon Sheri) गलांडेनगरमध्ये सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १५ वर्षाच्या मुलाबरोबर तीन महिन्यांपूर्वी एका मुलाशी भांडण झाले होते. फिर्यादीचा मुलगा मित्राबरोबर मदर तेरेसा शाळेतून चालत घरी येत होते.
बसस्टॉपजवळ आले असताना त्यांच्या शाळेत शिकणारा मुलगा व त्याचे ३ मित्र आले.
त्यांनी फिर्यादीचा मुलगा व त्याचा मित्रावर ब्लेडने हातावर, पोटारीवर वार करुन जखमी केले.
त्यातील एकाने फिर्यादीच्या मुलास कमरेच्या पट्टयांनी मारहाण केली. सहायक फौजदार ढावरे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | 15-year-old boy stabbed; Incident in Vadgaon Sheri

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टरकडे 25 लाखांची खंडणीची मागणी, 7 जणांवर FIR; पिंपरी चिंचवड परिसरातील घटना

Maharashtra Politics | विधानपरिषद उमेदवारी अन् देवेन भारतींच्या नियुक्तीवरून शिंदे गटात नाराजीचा सूर

MP Sanjay Raut | फक्त विरोधकांवरच कारवाई का? मुश्रीफांच्या घरी ईडीच्या कारवाईवरून संजय राऊतांचा सवाल

 

Related Posts