IMPIMP

MP Sanjay Raut | फक्त विरोधकांवरच कारवाई का? मुश्रीफांच्या घरी ईडीच्या कारवाईवरून संजय राऊतांचा सवाल

by nagesh
 Maharashtra Politics News | no one dared to insult balasaheb thackeray so much sanjay raut target cm eknath shinde and bjp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या पुणे आणि कागल येथील घरावर आज पहाटे ईडीने छापे (ED Raid) टाकले. सध्या ईडीकडून मुश्रीफ यांची चौकशी सुरु आहे. ईडीच्या कारवाईनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी या प्रकरणात सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत मुश्रीफ हे लढवय्या नेता असून ते यातून लवकरच बाहेर पडतील असं राऊत (MP Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाले संजय राऊत?

हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. फक्त विरोधकांवरच कारवाई का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. मुश्रीफांवर सूडबुद्धीने कारवाई केली आहे. मात्र मुश्रीफ हे लढवय्ये नेते आहेत, त्यांनी संघर्ष पाहिला आहे. ते या संकटाचा धिराने सामना करतील आणि लवकरच या सर्वांमधून बाहेर पडतील असं संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी म्हटले.

 

पुण्यातील मालमत्तांवर छापेमारी

ईडीने बुधवारी सकाळी मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर छापे टाकले. पुण्यातील कोंढवा येथील अशोका मुज सोसायटी आणि गणेशखिंड रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. कोंढवा भागात मुश्रीफ यांचे नातेवाईक राहायला आहेत. तसेच मुश्रीफ यांच्या कोरेगाव पार्क आणि बंडगार्डन येथील मालमत्तांवर देखील ईडीने छापे टाकले आहेत.

 

काय आहे प्रकरण?

काही महिन्यांपूर्वी किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहार
केल्याचे आरोप केले होते. 2020 साली आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना
(Appasaheb Nalawde Sugar Factory) पारदर्शक पद्धतीने व्यवहार न होता ब्रिक्स इंडिया प्रा. लि.
(BRICS India Pvt. Ltd.) कंपनीला चालवण्यास दिला.
या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केली होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MP Sanjay Raut | shivsena mp sanjay raut reacts to the case of ed raids on hasan mushrifs house

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | कॅनॉलमध्ये उडी मारुन तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; मृतदेह मिळून न आल्याने बनावाचा संशय

MLA Bachchu Kadu | आमदारांच्या अपघाताची मालिका सुरुच, रस्ता ओलांडताना आमदार बच्चू कडूंचा अपघात; गंभीर जखमी

Hasan Mushrif | माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागलमधील घरावर ईडीची छापेमारी

 

Related Posts