IMPIMP

Pune Crime News | गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टरकडे 25 लाखांची खंडणीची मागणी, 7 जणांवर FIR; पिंपरी चिंचवड परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | 25 lakh extortion demand from govt contractor, FIR against 7; Incidents in Pimpri Chinchwad area

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime News | घरातील महिलांचे अश्लील फोटो (Obscene Photos) आणि व्हिडिओ (Videos) व्हायरल करण्याची धमकी देऊन गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टरकडून पाच लाख रुपये खंडणी (Extortion) घेतली. त्यानंतर कोयत्याने हल्ला करुन पुन्हा 25 लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी सात जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार (Pune Crime News) 2 डिसेंबर 2022 ते 10 जानेवारी 2023 या कालावधीत लक्ष्मी चौक हिंजवडी आणि भोसरी पी.एम.टी. ऑफिस समोर घडला आहे. (Pimpri Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अशोक सांगळे (Ashok Sangle), रुद्र चाटे (Rudra Chate) व त्यांचे इतर पाच साथीदार यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) आयपीसी 384, 385, 341, 427, 506, 143, 147, 148, 149 महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), आर्म अॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत एका 34 वर्षीय गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टर यांनी मंगळवारी (दि.10) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टर (Government Contractor) आहेत.
अशोक सांगळे याने कामावरुन कमी केले व पैसे दिले नाहित याचा राग मनात धरुन फिर्यादी यांना घरातील
महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल (Viral) करण्याची धमकी देऊन पाच लाख रुपये खंडणी घेतली.
त्यानंतर आरोपीने आणखी 25 लाख रुपयांची मागणी केली.
पैसे दिले नाहीतर जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to Kill) अशोक सांगळे याने दिली.
तर रुद्र चाटे आणि त्याच्या इतर पाच साथीदारांनी भोसरी येथील पी.एम.टी. ऑफिस येथे फिर्यादी यांची गाडी
आडवून त्यांच्यावर लोखंडी कोयत्याने हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | 25 lakh extortion demand from govt contractor, FIR against 7; Incidents in Pimpri Chinchwad area

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | विधानपरिषद उमेदवारी अन् देवेन भारतींच्या नियुक्तीवरून शिंदे गटात नाराजीचा सूर

MP Sanjay Raut | फक्त विरोधकांवरच कारवाई का? मुश्रीफांच्या घरी ईडीच्या कारवाईवरून संजय राऊतांचा सवाल

MLA Bachchu Kadu | आमदारांच्या अपघाताची मालिका सुरुच, रस्ता ओलांडताना आमदार बच्चू कडूंचा अपघात; गंभीर जखमी

 

Related Posts