IMPIMP

Pune Crime News | वारजे माळवाडीतील पप्या उकरे टोळीविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई

by nagesh
Pune Crime News | Action under Mokka Act against Papaya Ukere gang in Warje Malwadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | वारजे माळवाडी आणि परिसरात उच्छाद घालणार्‍या उकरे टोळीचा प्रमुख वैभव उर्फ पप्पा शांताराम उकरे (24) याच्यासह त्याच्या साथीदारांवर मोक्का कायद्यान्वये MCOCA (Mokka Action) कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वैभव उर्फ पप्या शांताराम उकरे (24, रा. दुर्गामाता मंदिरामागे, वडारवस्ती, कर्वेनगर), आशितोष / आशुतोष नारायण साठे (19, रा. मु.पो. कुळे, ता. मुळशी) आणि गणेश उत्तम माने (22, रा. विश्व कॉलनी, आकाशनगर, वारजे) यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 27 नोव्हेंबर 2022 रोजी टोळीचा म्होरक्या पप्या उर्फ वैभव उकरे हा त्याच्या 8 ते 9 साथीदारांसह वारजे परिसरातील जुन्या जकात नाक्याजवळील आकाशनगरमध्ये गेला होता. तेथे त्याने आणि त्याच्या साथीदाराने एकाला बेदम मारहाण केली. हवेत कोयते फिरवत पप्पुभाई हा इथला भाई आहे, पप्पु भाईच्या नादाला लागाल तर एकेकाला खल्लास करून टाकेन असे म्हणून दहशत पसरवली. (Pune Crime News)

 

याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) गुन्हा दाखल आहे.
टोळीचा म्होरक्या वैभव उर्फ पप्या उकरे हा प्रत्येक गुन्हयामध्ये काही सामाईक व काही नवीन साथीदारांना
सोबत घेवुन गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले (Warje Police) .
त्यामुळे त्यांच्याविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक डीएस हाके
(Sr PI DS Hake) यांनी पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा (IPS Suhail Sharma) यांच्या मार्फत
अप्पर आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे सादर केला होता. आता त्यांच्यावर उकरे आणि त्याच्या साथीदारांविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Crime News | Action under Mokka Act against Papaya Ukere gang in Warje Malwadi

 

हे देखील वाचा :

Solapur ACB Trap | 25 हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या माजी सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्याला सक्त मजुरीची शिक्षा

Sanjay Raut | ‘हिंमत असेल तर अंगावरची राजवस्त्रे काढून बाहेर या’, संजय राऊतांचा नारायण राणेंना इशारा

Jitendra Awhad | मुंबईतील भांडूपमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात जोरदार बॅनरबाजी

 

Related Posts