IMPIMP

Jitendra Awhad | मुंबईतील भांडूपमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात जोरदार बॅनरबाजी

by nagesh
Jitendra Awhad | jitendra awhad stands on his comment about his shivaji maharaj controversial comment

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या एका वक्तव्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सत्ताधारी भाजपकडून याबाबत अजित पवारांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी होत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र (Jitendra Awhad) आव्हाडांनी औरंगजेबाबाबत कलेल्या ट्वीटमुळे ते देखील चांगलेच अडचणीत सापडले आहेत. औरंगजेब हा धर्मद्वेष्टा नव्हता अशा आशयाचे ट्वीट जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) केले होते. त्यावर सत्ताधाऱ्यांकडून आव्हाडांवर सडकून टीका केली जात आहे. त्यातच मुंबई येथील भांडूप परिसरात आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बॅनर लावल्याचे समोर आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भांडूपमध्ये जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात बॅनर लावले असून त्यावर, ‘मुंब्रा रक्षक जितुद्दीन खान असा’ उल्लेख करण्यात आला आहे. तसेच या बॅनरवर ‘मॉडर्न अफजल खान अर्थात जितुद्दीन खान याचं करायचं काय’ अशा अशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे.

 

जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) औरंगजेबाबाबत एक ट्वीट केले होते. त्यात त्यांनी औरंगजेब हा धर्मद्वेष्टा नव्हता असा उल्लेख केला आहे. त्यांच्या या ट्वीटवर राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलेच घमासान रंगले. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी जितेंद्र आव्हाडांवर टीका करताना औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेब ‘जी’ केला होता. त्यावर विरोधकांकडून सडकून टीका झाल्यानंतर त्यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून आपली भूमिका जाहीर केली होती.

 

चंद्रशेखर बावनकुळेंनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, क्रूरकर्मा, पापी औरंग्याने छत्रपती श्री. संभाजी महाराज यांना हालहाल करून त्यांचे प्राण घेतले. औरंग्याने काशी विश्वेश्वराचे मंदीर फोडले. अशा नीच क्रूरकर्म्याला मी स्वप्नातही ‘जी’ म्हणू शकत नाही.

 

 

त्यावर पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, आमच्या पक्षाची औरंग्याबाबतची भूमिका सर्वांना ठावूक आहे.
त्याचप्रमाणे औरंग्या राष्ट्रवादीचे श्रध्दास्थान आहे हे आव्हाडांनी अनेकदा सिध्द केले आहे.
आम्हाला नसत्या शब्दच्छलात अडकवून स्वतःला स्वच्छ व शुध्द असल्याचे दाखवू नका.
औरंग्याचे आणि तुमचे नाते जगाला ठाऊक आहे. असे उत्तर बावनकुळेंनी जितेंद्र आव्हाडांना (Jitendra Awhad) दिले आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाडांच्या भांडूप येथील बॅनरने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Jitendra Awhad | posters against jitendra awhad in mumbai over aurangzeb row

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पोलीस शिपायाचा परस्पर कारनामा; लोहमार्ग उपअधीक्षकाच्या नावाने परस्पर मागितले सीसीटीव्ही फुटेज

Devendra Fadnavis | योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होणाऱ्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘उद्योगाला आकृष्ट करण्यासाठी मुंबईत…’ (व्हिडिओ)

Arvind Sawant | ‘त्यांना दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ दिसत, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ नाही’, अरविंद सावंतांचा बावनकुळेंवर हल्लाबोल

 

Related Posts