IMPIMP

Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलिसांकडून घरफोडी करणार्‍याला अटक, डान्सरच्या घरावर मारला होता डल्ला, पोलिसांकडून 12 लाखाचा ऐवज जप्त

by nagesh
Pune Crime News | Bharti Vidyapeeth police arrest burglar,police seize 12 lakhs

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या (Bharti Vidyapeeth Police Station) हद्दीतील मांगडेवाडीतील (Mangdewadi) महावीर विहारमध्ये राहणार्‍या डान्सरच्या घरातील 13 लाख 10 हजाराचा ऐवज चोरून नेणार्‍यास (Theft In Dancer Home) पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 12 लाख 22 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

शुभम अशोक माने Shubham Ashok Mane (23, सध्या रा. फ्लॅट नंबर 410, मांगडेवाडी, कात्रज, पुणे. मुळ रा. सर्व्हे नंबर 1, भवानी पार्क, मंदार सोसायटी, धनकवडी शेवटचा बसस्टॉप, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 26 जून 2023 ते दि. 9 जुलै 2023 च्या दरम्यान आरोपीने डान्सरच्या घरातील 7 लाख 50 हजार रूपये आणि 5 लाख 60 हजार रूपये किंमतीचे 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. त्याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

भारती विद्यापीठ दाखल झालेल्या घरफोडीचा तपास करत असताना पोलिस अंमलदार राहुल तांबे आणि विक्रम सावंत यांना सदरील गुन्हा हा शुभम अशोक माने याने केल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याला दि. 9 जुलै 2023 रोजी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली.

पोलिसांनी तपासादरम्यान त्याच्याकडून 5 लाख 37 हजार रूपये रोख, 5 लाख 60 हजार रूपये किंमतीचे दागिने, 1 लाख 25 हजार रूपयांचा सॅमसंग कंपनीचा एस 23 अल्ट्रा, लोखंडी रॉड आणि चावी असा एकुण 12 लाख 22 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil),
पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil),
सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार (Sr PI Vijay Kumbhar),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक (PI Vijay Puranik),
गिरीश दिघावकर (PI Girish Dighavkar), सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ
(API Amol Rasal), पोलिस अंमलदार राहुल तांबे, विक्रम सावंत, सचिन सरपाले,
आशिष गायकवाड, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे आणि अभिनय चौधरी यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

 

Web Title : Pune Crime News | Bharti Vidyapeeth police arrest burglar,police seize 12 lakhs

 

हे देखील वाचा

 

Related Posts