IMPIMP

Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलिसांकडून मॉलचा कर्मचारी असल्याचे भासवुन वाहने चोरणार्‍यास अटक

by nagesh
Pune Crime News | Bharti Vidyapeeth Police arrests vehicle thief pretending to be a mall employee

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | डी मार्ट (Dmart) सारख्या मोठ-मोठया मॉलचा कर्मचारी असल्याचे भासवुन मॉलमध्ये (Malls In Pune) चारचाकी वाहने वॅलेट पार्किंग करून देण्याचा बहाणा करून ग्राहकांच्या चारचाकी चोरणार्‍यास (Vehicle Theft) भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) अटक केली आहे. त्याच्याकडून 15 लाख रूपये किंमतीच्या 2 चारचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. (Pune Crime News )

ऋग्वेद चंद्रकांत भिसे Rigveda Chandrakant Bhise (23, रा. एसआरए बिल्डींग, प्रयेजा सिटी मागे, सिंहगड रोड, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदार हे परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे आणि हर्षल शिंदे यांना चारचाकी चोरणारा कात्रज-कोंढवा रोडवर थांबला असल्याची माहिती मिळाली. प्राप्त झालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याला सापळा रचुन अटक केली. (Pune Crime News )

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने डी मार्ट सारख्या मोठ-मोठया मॉलचा कर्मचारी आहे असे भासवुन मॉलमध्ये चारचाकी वाहने वॅलेट पार्किंग करून देण्याचा बहाणा करून ग्राहकांच्या चारचाकी चोरल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून 15 लाख रूपये किंमतीच्या 2 चारचाकी जप्त केल्या आहेत.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil),
पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil),
सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार (Sr PI Vijay Kumbhar),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक (PI Vijay Puranik), सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ (API Amol Rasal), सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर कदम (API Sammer Kadam), पोलिस उपनिरीक्षक गौरव देव (PSI Gaurav Dev), पोलिस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, हर्षल शिंदे, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, सचिन सरपाले, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत आणि व्ही.एन. तनपुरे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.

Web Title : Pune Crime News | Bharti Vidyapeeth Police arrests vehicle thief pretending to be a mall employee

Related Posts