IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – 75 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील 7 जणांसह इचलकरंजीमधील एकाविरूध्द गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime News | Bharti Vidyapeeth Police Station - A case has been registered against 7 people from Pune along with one from Ichalkaranji for defrauding Rs 75 lakh

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | 40 टक्के परतावा देण्याच्या आमिषाने 75 लाख रूपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याप्रकरणी पुण्यातील 7 जणांसह इचलकरंजीमधील (Ichalkaranji) एकाविरूध्द भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये (Bharti Vidyapeeth Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर (Kolhapur) येथील कागल पोलिस स्टेशनमधुन (Kagal Police Station) हा गुन्हा वर्ग करून तो भा.वि. पोलिस स्टेशनमध्ये (BV Police Station Pune) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

गणेश रामचंद्र पडवळ (Ganesh Ramchandra Padwal), मयुर सतिश वांडरे (Mayur Satish Vandre),
वसंत भागुजी दगडे (Vasant Bhaguji Dagde), प्रशांत मारूती पायगुडे (Prashant Maruti Paigude),
गिरीश परळीकर (Girish Parlikar), ज्ञानेश्वर खटावकर (Dnyaneshwar Khatavkar), ओंकार सतिश वांडरे
Omkar Satish Vandre (सर्व रा. पुणे) आणि अरिहंत धनपाल कुपवारे Arihant Dhanpal Kupware
(रा. इचलकरंजी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सतिश बाबुराव खोडवे (40, रा. शिवनेरी जयसिंग पार्क, कागल, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. याबबात अधिक महिती अशी की, ऑगस्ट 2021 ते दि. 7 मार्च 2023 दरम्यान फास्टट्रॅक ट्रेडींग सर्व्हिसेस या कंपनीच्या आंबेगाव (पुणे) येथील कार्यालयात हा गुन्हा घटना आहे. यातील आरोपींनी आपआपसात संगणमत करून 40 टक्के परताव्याचे आमिष दाखवुन खोडवे यांच्याकडून गुंतवणूक घेतली. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

खाडवे यांना गणेश पडवळ आणि मयुर वांडरे यांनी नोटरी स्टॅम्प करून देवुन त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी
आंबेगाव (Ambegaon Pune) येथे बोलावले. त्यांच्याकडून मोठी गुंतवणूक घेतली मात्र त्यांना कुठल्याही
प्रकारचा परतावा न देता त्यांची 75 लाख रूपयांची फसवणूक (Fraud Case) केली.
सुरूवातीला खोडवे यांनी कागल पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.
सदरील गुन्हा हा भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडला असल्यामुळे तो भा.वि. पो. स्टेशनमध्ये
वर्ग करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे (PSI Shinde) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | Bharti Vidyapeeth Police Station – A case has been registered against 7 people from Pune along with one from Ichalkaranji for defrauding Rs 75 lakh

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : 33 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Pune – G20 Summit | पुणे : जी-२० परीषदेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न

Maharashtra Politics News | काका मला वाचवा म्हणायची अजित पवारांवर वेळ आली, शिंदे गटाच्या खासदाराची टीका

 

Related Posts